ज्या मालमत्तांची बांधकाम परवानगी असेल, गुंठेवारी भरलेली आहे ते तोडणार नाही - प्रशासक जी.श्रीकांत

 0
ज्या मालमत्तांची बांधकाम परवानगी असेल, गुंठेवारी भरलेली आहे ते तोडणार नाही - प्रशासक जी.श्रीकांत

ज्या मालमत्तांची बांधकाम परवानगी असेल, गुंठेवारी भरलेली आहे ते तोडणार नाही - प्रशासक जी.श्रीकांत

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)

महापालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहिम जोरात सुरु आहे. अगोदर शहरात येणा-या रस्त्यावरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पडेगाव ते शरनापूर फाटा रस्त्यावरील अतिक्रमण कार्यवाही दुस-या दिवशीही सुरु आहे. यानंतर जळगांव रोड वरील अतिक्रमणे काढणार आहे.

सर्वात अगोदर मुकुंदवाडी ते चिकलठाणा ते एपिआय काॅर्नर, बीड बायपास, महानुभव चौक पैठण रोड ते नक्षत्रवाडी येथील हजारो अतिक्रमण काढण्यात आली. उपायुक्त संतोष वाहुळ यांच्या नेतृत्वाखाली हि मोठी कार्यवाई शहरात सुरु आहे.

आज पडेगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटावो मोहीमेस मनपा आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी पाय फ्रॅक्चर असताना भेट दिली. यावेळी काही बाधित मालमत्ताधारकांनी त्यांची भेट घेवून आपली व्यथा सांगितली. याला उत्तर देताना त्यांनी सांगितले आम्हालाही संवेदना आहे. तुमचे घर दुकाने पाडताना आम्हालाही दु:ख होते परंतु शहर ऐतेहासिक असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात शहरात येतात. रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहतूकीला अडथळा होतो. घर दुकान बांधण्यास मनपाला हरकत नाही अगोदर महापालिकेकडून बांधकाम परवानगी काढा व गुंठेवारी मालमत्ता असल्यास गुंठेवारी भरुन कायदेशीर मालमत्ता करुन घ्यावे महापालिका तुमच्या मालमत्तेला हात लावणार नाही. सर्व्हिस रोड कार्यवाही नंतर हि मोहीम थांबणार नाही शहरात सुध्दा हि कार्यवाही सुरु राहणार आहे. जुन्या शहरातील अतिक्रमणे काढली जातील. ज्यांनी डिपी प्लॅन मध्ये मोबदला घेतलेला आहे तरी पण त्या जागेवर अतिक्रमण केले असेल काढून घ्यावे ज्यांची मालमत्ता बाधित होत आहे त्यांनी टिडिआर घ्यावे असे आवाहन त्यांनी शहरातील नागरीकांना केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow