ऐका ओवेसी हे छत्रपती संभाजीनगर आहे हे बदलण्याची हिम्मत कोणाची नाही - देवेंद्र फडणवीस
ऐका ओवेसी हे छत्रपती संभाजीनगर आहे हे बदलण्याचे कोणाचीही हिंमत नाही - देवेंद्र फडणवीस
मतांच्या धर्मयुद्धासाठी तयार व्हा...
रजाकारांचे मनसुबे हाणून पाडा....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) ऐका ओवेसी हे छत्रपती संभाजीनगर आहे. हे नाव बदलण्याची हिम्मत कोणाच्या बापाची नाही असा घणाघात बजरंग चौक येथील जाहीर सभेत महायुतीच्या तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पुढे बोलताना लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या 10 जागा या वोट जिहाद करून पाडण्यात आल्या. परंतु आता संभाजीनगरकरांनो, वोट जिहादला उत्तर देण्यासाठी मतांचे धर्मयुद्ध करायचे आहे. त्यासाठी तयार राहा असे आवाहन महायुतीचे उमेदवार अतुल सावे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रजाकारांची सत्ता आणू पाहणार्यांचे मनसुबे उधळून लावण्याचेही आवाहन त्यांनी या सभेत केले.
यावेळी पूर्वचे महायुतीचे उमेदवार तथा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. भागवत कराड, औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर, अनिल मकरिये, भगवान घडामोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख, आरपिआयचे बाबूराव कदम, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे नेते हाजी एजाज देशमुख, माधुरी अदवंत, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, अमृता पालोदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे नाव दिल्यानंतर एक मुस्लिम महिला म्हणाली की, छत्रपती संभाजीराजे कोण आहेत, तर त्यांना सांगतो की, जे एकही युद्ध हरले नाहीत आणि औरंगजेबाला नामोहरम केले ते संभाजीराजे आहेत. केवळ फितुरांमुळे त्यांना पकडणे शक्य झाले. आज त्याच औरंगजेबाचे सरकार आणण्याचा प्रयत्न आज होत आहे. रजाकारांचे सरकार आणण्याचे ज्यांचे मनसुबे आहेत, त्यांना आपण सागू इच्छतो की, आता आम्ही जागे झालो आहोत.
हे मनसुबे आता पूर्ण होणे शक्य नाही. लोकसभेत त्यांनी वोट जिहाद केल्यामुळे महायुतीचे 10 उमेदवार पडले. हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की बटेंगे तो कटेंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रहोंगे तो सेफ रहोंगे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे भगव्याशी गद्दारी करणार्यांना जागा दाखवायची असल्याचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच आलीकडच्या काळात आमच्या नेत्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला लाज वाटू लागली आहे. आता ते त्यांनाही जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणताय. त्यामुळे आता ही निवडणूक आपली एकजूट दाखवण्याची आहे, असेही ते म्हणाले.
विकासासाठी एकजूट व्हा...
औरंगाबाद पूर्व मतदारसंघासह संपूर्ण शहराच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना पुन्हा एकदा मतांचा आशीर्वाद देऊन विजयी करा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री तथा पूर्वचे उमेदवार अतुल सावे यांनी केले. तसेच महायुतीच्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामुळेच जिल्ह्यात 52 हजार कोटींची गुंतवणूक आली. तसेच सिडकोतील 35 हजार कुटुंबांना आज लिज होल्डचे फ्रीहोल्ड सुविधा मिळणार आहे. मुबलक पाणी दोन तीन महीन्यात मिळणार आहे. माझा मुकाबला रजाकारच्या औलाद एमआयएमशी आहे पुढेही हा विकास असाच होत राहील. त्यासाठी पूर्वतून आपल्याला विजयी करा, असे आवाहन सावे यांनी केले.
औरंगाबाद पश्चिममध्ये एमआयएम पुरस्कृत उमेदवार
शहरातील औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची लढत ही एमआयएमसोबत आहे, असे अतुल सावे म्हणाले. हे अगदी बरोबर असून पश्चिममध्ये जरी एमआयएमचा उमेदवार नसला तरी उद्धव ठाकरे गटाने जे उमेदवार पश्चिममध्ये दिले, ते अप्रत्यक्षरीत्या एमआयएमचे पुरस्कृत उमेदवारच आहे, अशा शब्दांत औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गटावर टिका केली.
यावेळी बाबुराव कदम, प्रदीप जैस्वाल, बापू घडामोडे यांनी भाषण केले.
What's Your Reaction?