शिवसेना भवनात श्रींचे उत्साहाच्या वातावरणात आगमन...

 0
शिवसेना भवनात श्रींचे उत्साहाच्या वातावरणात आगमन...

शिवसेना भवनात श्रींचे उत्साहाच्या वातावरणात आगमन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27 (डि-24 न्यूज) - शहरातील संभाजी पेठ, औरंगपुरा भागात स्थित शिवसेना भवनात आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्रींचे आगमन झाले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गणरायाची विधीवत पूजा अर्चना करून प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते मनोभावे आरती करण्यात आली. 

विघ्नहर्ताच्या आगमनाने संपूर्ण शिवसेना भवन परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण अधिकच मंगलमय झाले.

श्रींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. फुलांच्या उधळणीने व पारंपरिक पद्धतीने केलेल्या स्वागताने आगमन सोहळ्याला विशेष रंग चढला.

शिवसेना भवनात दिव्यांची रोषणाई, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची प्रतिमा व भगवे झेंडे आणि फुलांनी सजावट करण्यात आली होती. गणरायाचे हे आगमन ऐतिहासिक असल्याचे सांगत सर्व गणेश भक्ताचे जीवनातील दुःख नाहीसे करून सुख भक्तांना सुख प्राप्ती होवो, अशी भावनिक प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली. या आगमनामुळे शिवसेना भवनात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगप्रमुख राजू वैद्य, जिल्हा समन्वयक सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख विजय वाघमारे, आनंद तांदुळवाडीकर, श्रीरंग आमटे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, सुरेश गायके, सचिन खैरे, देवा त्रिभुवन, नारायण कानकाटे, विजय सूर्यवंशी, प्रशांत डीघोळे, शिवहरी लग्गड, महिला आघाडी संपर्कसंघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, दुर्गा भाटी, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, शहर संघटक सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ, सुनिता सोनवणे, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, रेणुका जोशी, कांता गाढे व लता शंखपाळ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow