संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना अक्रामक, केले जोडेमारो आंदोलन...!

 0
संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना अक्रामक, केले जोडेमारो आंदोलन...!

संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक...

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून केला निषेध...राऊतांचा फोटो जाळून केला निषेध...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) उबाठाचे खा. संजय राऊत यांनी वरिष्ठ सभागृहाच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्या विषयी अपमानास्पद बेताल वक्तव्य केल्या विरोधात शिवसैनिकांमध्ये मध्ये प्रचंड संतापाची लाट आज दिसून आली.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात शिवसेनेच्या वतीने क्रांतीचौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या, यावेळी महिलांनी राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन केले.

"संजय राऊतच करायचं काय खाली मुंडके वर पाय", "महिलांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा धिक्कार असो" या घोषणांनी संपूर्ण क्रांतीचौक परिसर दणाणून गेला होता.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी संजय राऊत ह्या व्यक्तीने सभागृहाच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्या बाबत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे हे वक्तव्य म्हणजे समस्त महिला, माता ,भगिनींचा अपमान आहे, राऊत हे कायम महिलांच्या विषयी तिरस्कार करणारे वक्तव्य करत असतात , त्यांनी शिवसैनिकांचा अंत पाहू नये ,आज आम्ही फोटोला जोडे मारून आंदोलन करत आहोत यानंतर त्यांच्या घरात घुसून जोडे मारू असा इशारा दिला. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शिल्पा वाडकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले उपजिल्हाप्रमुख संतोष बोर्डे ,रंगनाथ राठोड , ॲड.पपू वर्मा, शहर संघटक संतोष मरमठ, मनोज बल्लाळ, दीपक पवार , प्रसिद्धीप्रमुख अभिजीत पगारे, उपशहर प्रमुख राजेश जंगले, विजय पैठणे, अनिल बिरारे, गणेश जाधव ,संजय वरकड ,शिवा हिवाळे, गणेश तेलोरे, जितेंद्र धोंगडे, मयूर भाले, मनोज पवार, प्रवीण चौधरी, रामेश्वर शेळके, अर्जुन सरोदे, अमोल साळवे, संजय भुजबळ, प्रवीण चौधरी, उद्योग आघाडी जिल्हा संघटक मोहन बरंडवाल, मोहित त्रिवेदी, महिला आघाडीच्या जिल्हासमन्वयक तेजस्विनी केंद्रे, लक्ष्मी नरहिरे, तालुकाप्रमुख उषा हांडे ताई, नीलम वडोदे ,वनिता ठाकूर, अरुण चव्हाण, मीना बेलसरे, त्रिभुवन, शीतल लुगडे, योगिता शिंदे, भोकरे, कांता चव्हाण, बरवाल, स्मिता पठारे, सीमा शिंदे, राखी सुरडकर, अर्चना चव्हाण, अरुना तुपे, युवासेना शहर प्रमुख शुभम काळे, शुभम पवार, ऋषिकेश मुळे, सुरज शिंदे ,गणेश दाउमा,अरविंद कामटेकर, सुनील राऊत, राजू शेळके , बन्सी म्हस्के आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow