जटवाडा रोडवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब तात्काळ हटवा - आमदार प्रदीप जैस्वाल

 0
जटवाडा रोडवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब तात्काळ हटवा - आमदार प्रदीप जैस्वाल

जटवाडा रोड वरील वाहतूकीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब तात्काळ हटवा - आमदार प्रदीप जैस्वाल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - हर्सुल जेल ते जटवाडा रोडवर अर्धवट सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू झाले आहे. परंतु ठेकेदाराने रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब हटवले नसल्याने या रस्त्यावर अपघात होत आहे. काल एका कारने तीन दुचाकीला उडवले या घटनेत एक युवक जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी जटवाडा रोड, सईदा काॅलनीला भेट दिली. रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा. रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब तात्काळ हटवा व अंडरग्राऊंड विजेची लाईन टाकण्याचे आदेश महावितरण व महापालिका प्रशासनाला दिले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महावितरण, महापालिका अतिक्रमण विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते. 

सईदा काॅलनी येथील केजीएन पार्क येथील काही रस्त्याचे सिमेंट काँक्रीट रोडचे लोकार्पण आमदार जैस्वाल यांनी फित कापून केले. काही रस्त्याचे काम लवकर सुरू करणार आहे. ड्रेनिज लाईनचे काम पूर्ण झाले नाही अजून काम सुरू आहे. नागरिकांनी काम करण्यासाठी सहकार्य करावे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नळाचे कनेक्शन जोडनी सुरू आहे काही महीन्यात नळाला पिण्याचे शुध्द पाणी मिळणार आहे. परिसरात राहिलेल्या विकासाचे काम केले जाईल असे आश्वासन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिले. याप्रसंगी सईदा काॅलनी जटवाडा रोड येथील नागरिकांनी जैस्वाल यांचे सत्कार करत केलेल्या विकास कामाबद्दल आभार मानले.

याप्रसंगी नगरसेवक राजगौरव वानखेडे, नगरसेवक किशोर नांगरे, माजी नगरसेवक रुपचंद वाघमारे, मोईन शेख लकी, एजाज खान, जेष्ठ पत्रकार मजहर शेख, जायेद खान, सय्यद रईस, शेख साहेब, नजीर भाई प्लंबर, अस्लम शेख, नाजिम शेख व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow