अन्न व सुरक्षा कायद्याची जनजागृती करण्यासाठी व्यापारी महासंघाचा पुढाकार...!

 0
अन्न व सुरक्षा कायद्याची जनजागृती करण्यासाठी व्यापारी महासंघाचा पुढाकार...!

अन्न व सुरक्षा कायद्याची जनजागृती करण्यासाठी व्यापारी महासंघाचा पुढाकार...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढें यांच्याकडे आल्यानंतर राज्यात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध सतत कार्यवाई सुरू असल्याने व्यापारी भयभीत झाले आहे. जे व्यापारी प्रामाणिकपणे अन्न व सुरक्षा कायद्याचे पालन करुन आपला व्यवसाय करतात ते पण संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने व्यापा-यांची कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी शहागंज येथील एका सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती.

व्यापारी महासंघाच्या वतीने अन्न व सुरक्षा कायद्याची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला. 

व्यवसाय करण्यासाठी परवाना, रिनिवल, डेड स्टाॅक, दंडाची रक्कम, भेसळयुक्त पदार्थ कसे ओळखावे, प्रयोगशाळा, स्वच्छता, कामगारांची आरोग्य तपासणी, अन्नपदार्थ सॅंपल, पॅकेजिंग, किती रकमेच्या व्यवसायासाठी परवान्याची गरज व छोटे व्यवसायिकांनी काय करावे. व्यापा-यांच्या व्यापार करण्याविषयी समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रश्न उत्तराचे सेशन कार्यशाळेत ठेवण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासनाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त सागर तेरकर, सेवानिवृत्त प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी यांनी या कार्यशाळेत व्यापा-यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया, राजेशपाल सिंग छाबडा, शिवशंकर स्वामी, लक्ष्मीनारायण राठी, सुनील चौधरी, विकास साहुजी, संतोष कावळे पाटील, जयंत देवळानकर, अन्वर खान, चेतन शर्मा हे पदाधिकारी आणि शेकडो व्यापारी उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow