नशामुक्त अभियान व बालविवाह मुक्त पंधरवड्याचे थाटात उद्घाटन...!

 0
नशामुक्त अभियान व बालविवाह मुक्त पंधरवड्याचे थाटात उद्घाटन...!

नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियान व बालविवाह मुक्त पंधरवड्याचे उद्घाटन 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, नशामुक्त भारत अभियान जिल्हा समिती, पोलीस विभाग, शिक्षण विभाग तसेच जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियान" व "बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर पंधरवडा" (दि. 13 जुलै ते 31 जुलै 2026) याचा शुभारंभ एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या नशामुक्त भारत व बालविवाहमुक्ती विषयावरील आकर्षक रांगोळ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अध्यक्षस्थानी

मिनू पी. एम., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर.

प्रमुख उपस्थिती

अभिनव बालुरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

डॉ. दीपक खरात, प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण विभाग

डॉ. जितेंद्र डोंगरे, मानसिक आरोग्य तज्ज्ञ

श्री. महादेव डोंगरे

श्रीमती करुणा कांबळे

श्री. अतुल पिंपरकर

श्री. प्रशांत पाटील

श्री. मामीलवाड, लेखाधिकारी

श्री. चंद्रकांत कवडे

सौ. दीपाली थावरे, उपशिक्षणाधिकारी

डॉ. शंखपाळ

श्री. साईनाथ ठोंबरे, उपअधीक्षक, अमली पदार्थ टास्क फोर्स

डॉ. छाया आवरगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व अधिकारी

प्रास्ताविक

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अश्विनी लाठकर, शिक्षण अधिकारी यांनी केले. नशामुक्ती अभियानाचा परिचय व उद्दिष्टे श्री. विलास चंदने यांनी मांडली.

शपथ व लोगो विमोचन

यावेळी अभिनव बालुरे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते "बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर" लोगोचे विमोचन करण्यात आले. श्री. महादेव डोंगरे यांनी बालविवाहमुक्तीची शपथ दिली.

मार्गदर्शन

कार्यक्रमात अभिनव बालुरे, डॉ. जितेंद्र डोंगरे यांनी पीपीटीच्या माध्यमातून अमली पदार्थांचे दुष्परिणाम व मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. गीता बागवडे यांनी बालविवाहमुक्त समाज निर्मितीसाठी जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी डॉ. कृष्णा रामचंद्र भावले, सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांनी व्यसनमुक्ती, जनजागृती व समाजसहभाग याविषयी मार्गदर्शन केले.

विशेष उपक्रम

कार्यक्रमस्थळी मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचे सुनील नागरगोजे, सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे सुनील बडे तसेच नशाबंदी मंडळाचे संघटक भाऊसाहेब पठाडे यांनी नशामुक्ती विषयक पोस्टर प्रदर्शन भरविले.

स्वागत व मनोगत

मान्यवरांचे स्वागत श्री. विलास चंदने लिखित "आत्मसंयम" या अमली पदार्थविरोधी ग्रंथाचे वितरण करून करण्यात आले.

शेख रशीद रहमान यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने एका व्यसनमुक्त रुग्णाने स्वतःचे अनुभव कथन करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमाचे स्वागत मा. बाबासाहेब अरवत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले. जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेच्या वतीने डॉ. शंखपाळ यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन व आभार

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. फड सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीमती लहाने-वाघ यांनी केले.

या कार्यक्रमास विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नशामुक्त आणि बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर घडविण्याचा निर्धा

र यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow