उद्या शहरातील आठ ठिकाणी मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन, युवकांना ब्लड डोनेशन करण्याचे आवाहन

 0
उद्या शहरातील आठ ठिकाणी मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन, युवकांना ब्लड डोनेशन करण्याचे आवाहन

उद्या आठ ठिकाणी मेगा ब्लड डोनेशन कॅम्प, युवकांना ब्लड डोनेशन करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- उद्या शहरातील आठ ठिकाणी ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्ताने दरवर्षी प्रमाणे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. हे ब्लड डोनेशन कॅम्प रात्री उशिरापर्यंत चालणार आहे युवकांनी मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशन करुन सर्वश्रेष्ठ दान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मरकज-ए-इस्लामी , युनुस काॅलनी, कटकट गेट, लाल मस्जिद, टाऊन हॉल, बागवान हाॅल, पैठण गेट, जम एम हाॅल सिल्क मिल काॅलनी, बडी मस्जिद समोर, जुने वाचनालय, चिकलठाणा, कोहिनूर लाॅन्स, रोजा बाग, टिपु सुलतान चौक, हिना नगर, चिकलठाणा, पावरलूम एमआयडिसी चिकलठाणा, नूर फंक्शन हाॅल, सवेरा चौक, कासंबरी दर्गा पडेगाव या आठ ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून ब्लड डोनेशन कॅम्प सुरू होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow