वंचितचे तीन दिग्गज उमेदवार या प्रभागातून, एमआयएम - वंचितची कांटे की टक्कर...?...

 0
वंचितचे तीन दिग्गज उमेदवार या प्रभागातून, एमआयएम - वंचितची कांटे की टक्कर...?...

प्रभाग 3 मधून वंचितचे दिग्गज उमेदवार, एमआयएम व वंचितची अटीतटीची लढाई या प्रभागातून...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत प्रभाग 3 च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या प्रभागात एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे दिग्गज उमेदवारांचा जोरदार मुकाबला होणार असल्याचे दिसून येत आहे. येथे या दोन पक्षांत कांटे की टक्कर बघायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रभागातून विधानसभा निवडणुक लढवलेले उमेदवार दिल्याने एमआयएमचे उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित सुधाकर भुईगळ 3 अ, मो.जरीना मो.जावेद कुरेशी 3 ब, करुणा देविदास वाघमारे 3 क, अफसरखान यासिनखान यांना उमेदवारी दिली आहे. दुपारी यादी आज जाहीर करण्यात आली. प्रभाग 24 मधून सतीश आसाराम गायकवाड, वर्षा संदीप काळे, पंकज बळीराम बनसोडे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow