औरंगाबाद नामांतराची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, रिव्ह्यू पेटीशन दाखल करणार याचिकाकर्ते
मुश्ताक अहमद यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...!
छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) औरंगाबाद नामांतराची सर्वोच्च न्यायालयात आज मुश्ताक अहमद यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. नामांतर विरोधातील बाॅम्बे हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळली होती या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुश्ताक अहमद यांनी दाखल केल्यानंतर आज या प्रकरणी न्यायमूर्ती ऋषीकेश राॅय, न्यायमूर्ती एस.व्ही.एन.भट्टी यांच्या बेंचसमोर सुनावणी होती. परंतु याचिकाकर्ते, त्यांचे वकिल सुनावणीस उपस्थित झाले नाही. याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या अगोदर 2 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने उस्मानाबादची याचिका फेटाळली होती l न्यायालयाने सांगितले एवढा संवेदनशील मुद्दा याबद्दल आज सुनावणी असताना व्हिडिओ काॅनफरन्सिंग द्वारे आपले मत मांडायला हवे होते. म्हणून न्यायालयाने आज हि याचिका फेटाळली. अगोदर मोहम्मद हिशाम उस्मानी यांची याचिका दाखल केलेली आहे ती आतापर्यंत बोर्डावर आली नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी विनंती मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाओद्दीन सिद्दीकी यांनी केली आहे.
मुस्लिम नुमायंदा कौन्सिल व सामाजिक संघटनांनी एकच याचिका दाखल करण्यासाठी निर्णय घेतला असताना मुश्ताक अहमद यांनी घाईगडबडीत आम्हाला विश्वासात न घेता याचिका दाखल केल्याने जियाओद्दीन सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास व्यक्त करत म्हटले आहे की मोहंमद हिशाम उस्मानी यांच्या याचिकेवर सुनावणी घ्यावी, याचिकाकर्ते यांचे मत काय ऐकून घ्यावे अशी अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुश्ताक अहमद यांनी सांगितले न्यायालयात एक दिवस अगोदर आमचे वकील अॅड फुजैल अयूबी यांनी अर्ज दाखल केला होता कि तारीख वाढवून द्यावे परंतु न्यायालयाने सुनावणी घेत याचिका फेटाळली. आम्ही 30 दिवसांच्या आत रिव्ह्यू पेटीशन दाखल करणार आहे असे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
What's Your Reaction?