मनपा ते चंपाचौक रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात, आयुक्त उतरले रस्त्यावर, अतिक्रमण हटवले

 0
मनपा ते चंपाचौक रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात, आयुक्त उतरले रस्त्यावर, अतिक्रमण हटवले

महापालिका मुख्यालय ते चंपा चौक रस्त्याचे रुंदीकरणाला सुरुवात

प्रशासक स्वतः उतरले रस्त्यावर

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.5(डि-24 न्यूज) 

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिका मुख्यालय ते चंपा चौक हा रस्ता अतिक्रमण मुक्त व रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रस्त्यावर जागोजागी झालेल्या अतिक्रमण मुळे वाहतूक नेहमी ठप्प होत होती. त्यानुसार या रस्त्यावर पाडापाडी करण्याची तयारी प्रशासनाने शनिवार, 31 ऑगस्ट रोजी केली होती, पण पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने सदर कारवाई स्थगित करण्यात आली होती.

शहराच्या विकास आराखड्यात रोशन गेट ते महापालिका मुख्यालयापर्यंत हा विकास योजना रस्ता 15 मीटर रुंदीचा आहे. मात्र अतिक्रमणांमुळे आजघडीला हा रस्ता फार अरुंद झाला आहे. यातील तीन किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्याचे काम करण्यापूर्वी या ठिकाणी असलेले अनाधिकृत

बांधकामे पाडण्यात येणार आहेत. करिता चंपाचौक ते मनपा मुख्यालय पर्यंत कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग, नगर रचना विभाग व पोलिस प्रशासनातर्फे संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यात येणार आहे.आज सिटी चौक पोलीस स्टेशन मार्फत पोलीस बंदोबस्त मिळाल्यावर सदर कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

स्मार्ट सिटी मार्फत चंपा चौक ते छत्रपती संभाजी नगर मनपा मुख्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम सुरू असल्याने सदरील रस्त्यावर लोकांनी आपले मिळकती समोर रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. तथापि प्रशासक यांनी जागोजागी वाहतूक ठप्प होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणारी असुविधा लक्षात घेऊन तसेच सुरू असलेले काँक्रीट रस्त्याचे काम पुन्हा सुरू होणे करिता या रस्त्यावरचे अतिक्रमण हटविण्याकरिता संबंधित विभागास त्वरित कारवाई करणे बाबत आदेशित करण्यात आले होते.

पोलीस विभागाचे सहाय्याने सकाळी नऊ वाजेपासून चंपा चौक पासून कार्यवाही सुरू करण्यात आली.

सदर कारवाई मध्ये पंधरा ते वीस रस्ता बाधित अतिक्रमणे तसेच आठ ते दहा नान रोटी सेंटर निष्कासित करण्यात आले. तसेच पाच हात गाडी व तीन हॉटेलचे काउंटर जप्त करण्यात आले. सदर कारवाई दरम्यान आयुक्त यांनी सदर ठिकाणी येऊन रस्ता बाधित अतिक्रमण धारकांना आपण केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याबाबत सूचना दिल्या. सदर कारवाई 

अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई वेळी उप आयुक्त सविता सोनवणे ,सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर , नईम अन्सारी इमारत निरीक्षक मजहर अली रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ ,कुणाल भोसले, शुभम घोडके ,नगर रचना विभागाचे अभियंता रामेश्वर सुराशे, राहुल मालखेडे, देशपांडे तसेच सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow