18 एप्रिलला पवित्र हज यात्रेसाठी मुंबईहुन पहीला जत्था जाणार, 1785 हाजी जाणार...!
पवित्र हज यात्रेसाठी मुंबईहुन पहीला जत्था 18 एप्रिलला, 1785 यात्रेकरू जाणार...
छत्रपती संभाजीनगर, दि.5 (डि-24 न्यूज)- खिदमाते हुज्जाज कमिटी औरंगाबाद यांच्या वतीने 4 व 5 एप्रिल 2026 रोजी किले अर्क येथील हज हाउस येथे आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसीय अंतिम हज प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जामा मस्जिदचे इमाम व खतीब हाफिज जाकिर यांच्या तिलावत-ए-कुरआनने झाली. हाफिज मुदस्सिर यांनी नात सादर केली. कमिटीचे सदर मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही यांनी हजचे महत्त्व व फजीलत यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अहिल्यानगर (अहमदनगर), बुलढाणा, बीड, जालना, परभणी, नांदेड व अकोला जिल्ह्यांतील आजमीनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पहिल्या दिवशी कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष मिर्झा रफत बेग व डॉ. रहीमुद्दीन यांनी “हजच्या प्रवासाची तयारी” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सौदी रियालसंबंधी आवश्यक माहिती दिली. पुढील सत्रात सय्यद साजिद अनवर यांनी एहराम व उमरा करण्याची पद्धत प्रत्यक्ष समजावून सांगितली. कार्यक्रमाचे संचालन मिर्झा अफसर बेग व अब्दुल बारी यांनी केले.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात पुन्हा तिलावत-ए-कुरआनने झाली. मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही यांनी हजचे अर्कान, त्याचे महत्त्व तसेच मदिनाच्या आदाब व जियारत याविषयी सविस्तर माहिती दिली. कमिटीचे उपाध्यक्ष सय्यद अजीज कुरेशी यांनी हजच्या पाच दिवसांबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी एकूण 1785 हाजीयांनी सहभाग घेतला, त्यात 896 पुरुष व 889 महिलांचा समावेश होता.
बाहेरून आलेल्या आजमीनांसाठी राहण्याची, जेवण व नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले. यंदाच्या हज यात्रेचा पहिला टप्पा 18 एप्रिल ते 4 मे 2026 दरम्यान असून या टप्प्यातील हाजी मदिना येथे रवाना होणार आहेत. दुसरा टप्पा 5 मे ते 19 मे 2026 दरम्यान असून या टप्प्यातील हाजी जेद्दा येथे जाणार आहेत. यावर्षी हाजीयांना किचनची सुविधा उपलब्ध राहणार नसल्याची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमिटीचे उपाध्यक्ष अजीज कुरेशी, नुरुद्दीन अन्सारी, खिदमतगार अफजल खान, हाजी याकुब खान, शेख फैसल, अकबर कादरी, हक्कानी, तारेक अब्दुल्ला, मोहम्मद अब्रार, मोईन, तालीम, जाफर मोतीवाला, साजिद मौलाना, मुजीब पटेल, हज हाउसचे अधिकारी अब्दुल बारी पटेल तसेच मुहम्मद जकीउद्दीन सिद्दीकी यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला.
What's Your Reaction?