शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने...

शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- 31 हजार 500 कोटीच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांमध्ये खोटा नरेटीव्ह पसरवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. शेतकऱ्यांची मूळ मागणी हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे. पुरात वाहून गेलेल्या घरांची, जनावरांची व दुकानांची आर्थिक भरपाई मुबलक प्रमाणात मिळावी ही असल्याने आज या मागण्या मान्य केल्या तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवार, 8 ऑक्टोंबर रोजी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जय भवानी जय शिवाजी..सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे..पॅकेजच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्या राज्य सरकारचा अधिकार असो..शेतकऱ्याना हेक्टरी 50 हजार रुपये मिळालेच पाहिजे. खोटे पॅकेज देणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो..शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. अतिवृष्टी नुकसान भरपाई व सरसकट कर्जमुक्तीचे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक पोस्टर घेऊन आले होते.
संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये 2 लाख 36 हजार 528 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील बागायती, जिरायती व फळ पिकाची शेती पूर्णतः नष्ट झाली असून 587 गावे तर 2 लाख 62 हजार 840 शेतकरी बांधव या आपत्तीने बाधित झाले आहे. एकूण 17 व्यक्ती या अतिवृष्टीच्या पावसाने मृत्यू पावले असून 2 जण जखमी झाले आहे. लहान मोठे पकडून 200 पेक्षा अधिक दुधाळ व ओढ काम करणारे जनावरे वाहून गेल्याने दगावली आहे. पूर्णतः आणि अंशतः कच्च्या व पक्क्या घरांची हजारोंच्या संख्येने पडझड झालेली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी अंबादास दानवे यांनी दिली.
राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई पॅकेज जाहीर केले आहे. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात लाखो कोटींचे नुकसान झालेले असताना सदरील पॅकेज अत्यंत तुटपुंजे ठरणार आहे. या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुबलक मदत तर मिळणार नाहीच, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली असल्याची गंभीर टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे आणि घरे व पशुधनासाठी निकष शिथिल करून मदत करावी, या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात तीव्र निदर्शने करत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगर शिष्टमंडळाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, विजयराव साळवे, सुभाष पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, विजय वाघमारे, राजू इंगळे, अरविंद धिवर, अशोक शिंदे, श्रीरंग आमटे पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, गोपाल कुलकर्णी, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, विष्णु जाधव, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, विशाल खंडागळे, मदन चौधरी, राजेंद्र दानवे, जयसिंग होलीये, नितीन पवार, प्रमोद ठेंगडे, रवी गायकवाड, मंगेश भाले, किरण सालपे, राज नीळ, सचिन वाघ,बापू कवळे, राहुल सोनवणे, सोमनाथ नवपुते, बेंद्रे आप्पा, संजय हरणे, संदेश कवडे, गिरीश चपळगावकर, कमलाकर जगताप, दिनेशराजे भोसले, भाऊसाहेब रिठे, चंद्रकांत देवराज, राम केकान, विजय अडलग, सोपान बांगर, प्रतीक अंकुश, सुनील धात्रक, संतोष लिंबेकर, आनंद कुलकर्णी, साईनाथ जाधव, संजय कोरडे, नंदू लबडे, गौरव पुरंदरे, दीपक शिंदे, बबनराव वाघ, दीपक कणसे, रवी कसारे, ज्ञानेश्वर गिरी, राम चव्हाण, चिंतामण मदाडे, भाऊसाहेब सपकाळ, सुभाष लहाने, दत्ता उकिर्डे, नामदेव नलावडे, सुरेश नाडे, सोपान ठोंबरे, सुदाम गाडेकर, कुणाल पाठक, मनेश गाजरे, रामु सुरासे, विनोद दाभाडे, सतिश काळे, पवन दाभाडे, राकेश सक्सेना, सत्यनारायण गग्गड, यशवंत चौधरी, राजु बनकर, सतिश हिवाळे, रोहिदास चव्हाण, संतोष चंदन, संतोष शहाणे आकाश राकडे, बजरंग पाटील, अशोक कटारे, लक्ष्मण लांडे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे,
शहर संघटक सुनीता औताडे, नंदा काळवने,
सुनंदा खरात, मिना खरात, कविता मठपती, छाया देवराज, नंदा कळवणे, रेखा शहा, लता शंकपाळ, रूपाली मुंदडा, नुसरत जहाँ, बबिता रणयेवले, माधुरी देशमुख, संध्या कोल्हे, रंजना आहेर, रंजना कोलते, अनिता लगड, सुनिता महाजन, संगीता नरोडे, कांता फसाटे, वंदना कुलकर्णी, सुमित्रा हाळनोर, वंदना सावळकर, सुलोचना मगारे, संगीता घाडगे, सुकन्या चिंतामणी व रंजना कुलकर्णी उपस्थित होते.
What's Your Reaction?






