मुख्यमंत्र्यांची भेट घेवू द्या अन्यथा आंदोलनाचा इम्तियाज जलील यांचा इशारा
मुख्यमंत्र्यांची भेट घेवू द्या अन्यथा आंदोलनाचा इम्तियाज जलील यांचा इशारा
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यात अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शहरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिष्टमंडळाला दिले होते. त्या आश्वासनांचे काय झाले याचा जाब विचारण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुंतवणूकदारांना भेट घेऊ द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
चिकलठाणा विमानतळ व सिल्लोडच्या रस्त्यावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले जाईल. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा या पतसंस्थेत झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. शहरात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंत्री गिरीश महाजन व मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पैसे परत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन दिले होते परंतु आतापर्यंत पैसे परत मिळाले नाही म्हणून मुख्यमंत्री यांची भेट घेवून ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री सिल्लोड येथे येत आहे. गुंतवणूकदारांमध्ये महीला भगिनी पण आहेत हे पण आपल्या बहीणी आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
What's Your Reaction?