अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर, केले जोडेमारो आंदोलन
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांना जात विचारणा-या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्या विरोधात शहर व जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने जोडे मारो तीव्र आंदोलन करुन निषेध....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) आज शहर व जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र जोडेमारो निषेध आंदोलन करण्यात आले. लोकसभेमध्ये देशाचे विरोधी पक्ष नेते खा.राहुलजी गांधी यांना जात विचारणा-या अनुराग ठाकुर यांचा जोडे मारुन तीव्र निषेध करुन आंदोलन करण्यात आले व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुराग ठाकुर यांच्या वक्तव्याला पाठींबा दिला व एक्सवर पोस्ट केली एका प्रकारे अनुराग ठाकुर यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात विचारण्याचे समर्थन केले. म्हणुन भाजपा सरकारचा व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्या विरोधात अनुराग ठाकुर मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला.
खा. श्री राहुल गांधी यांची जात विचारणारे लोक त्याच विचार सरणीचे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला, हे तेच लोक आहेत ज्यांनी आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, विठ्ठल रामजी शिंदे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या कार्यात विघ्न आणले. या महापुरुषांनी समाजातील वंचित, दलित, अल्पसंख्याक दुबळ्यांचा आक्रोश मांडला, त्या सर्वांना अपमान, छळ, अश्लाघ्य टीकेला सामोरे जावे लागले. आज २१ व्या शतकातही ही मनुवादीवृत्ती डोके वर काढत आहे, तेच लोकसभेत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी दाखवले आहे, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर अनुराग ठाकूरच्या विधानाचे कौतुक केले, हे त्याहून गंभीर आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणार्या विधानाचे समर्थन करत आहे हे या देशाचे दुर्दैव आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते खा. श्री राहुलजी गांधी यांनी सामाजिक सुधारणेचे रणशिंग पुकारले आहे व जातीय जनगणनेसाठी प्रयत्न करीत आहे. असे शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ म्हणाले.
यावेळी शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.जफर अहेमद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.जितेंद्र देहाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ प्रकाश मुगदिया, इब्राहीम पठाण, डॉ. निलेश आंबेवाडीकर, गुलाब पटेल, अॅड.सयद अक्रम, दिपाली मिसाळ, जयप्रकाश नारनवरे, अनिस पटेल, विजय कांबळे, आकेफ रजवी, अॅड.एकबालसिंग गिल, सागर नागरे, रविद्र काळे, राहुल सावंत, अतिश पितळे, उमाकांत खोतकर, मोईन ईनामदार, दिक्षा पवार, अमजद खान, प्रशांत शिंदे, आबेद जहागीरदार, डॉ.सरताज पठाण, कैसर आजाद मनोज शेजुळ, रेखा राऊत, मंजु लोखंडे, इरफान इब्राहीम पठाण, अनिता भंडारी, हकीम पटेल बाबुराव कवसकर राजु डोंगरे, गणेश रिठे, रमेश काळे, शिला मगरे, रेखा मुळे, सिमा थोरात, योगेश थोरात, विद्या लांडगे, सबीया बाजी शेख, मोईन कुरैशी, मुददसिर अन्सारी, जमील खान, शेख कैसर बाबा, श्रीकृष्ण काकडे, प्रमोद सदाशिवे, सलीम खान, सयद फयाजोददीन, शफीक शहा, प्रतापसिंह होलीया, रेहाना बाजी शेख, सयद रुबीना, उत्तम दणके, जाफर खान, प्रदिप त्रिभुवन, विनायक सरवदे, चंद्रकांत बनसोडे, ज्ञानेश्वर ढेपे, अब्दुल माजेद पटेल, श्रीराम इंगळे, साळवे मामा, आमेर रफिक खान, स्वाती बासु, तारा जाधव, इंजि.इफतेखार शेख, नदीम सौदागर, मजीदउल्ला बरकतउल्ला, साहेबराव बनकर, आदी शहर व जिल्हा काँगेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?