संजय गायकवाड यांच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर, जोडे मारो आंदोलन करुन फोटो जाळले
संजय गायकवाड यांच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर, जोडे मारो आंदोलन करुन फोटो जाळले
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चुकीच्या शब्द वापरल्याने ओबीसी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी चार वाजता सकल ओबीसी समाज व अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व छायाचित्र जाळून निषेध करण्यात आला. यावेळी महिलांनी सुध्दा आंदोलनात सहभागी होत संताप व्यक्त केला.
यावेळी मनोज घोडके, ग.ह.राठोड, सुरेश आगलावे, एड महादेव आंधळे, रामभाऊ पेरकर, अशोक गिते, अशोक गेहलोत, अब्दुल कय्यूम नदवी, विष्णू वखरे, अशोक शेवगन, सरस्वती हरकळ, डॉ.सरोज नवपूते, अनिता देवतकर, रुपाली हिवाळे, रंजना गायके, सुभद्रा जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शासन अधिसूचना(मसुदा दुरुस्ती) रद्द करावे व आक्षेप दाखल करण्यात आ
ले.
What's Your Reaction?