भाजपाने केला निवडणुकीत पैशांचा नंगानाच, निवडणूक आयोग करणार का कार्यवाई - इम्तियाज जलील

 0
भाजपाने केला निवडणुकीत पैशांचा नंगानाच, निवडणूक आयोग करणार का कार्यवाई - इम्तियाज जलील

पूर्व मध्ये निवडणूकीत धांदलीचा इम्तियाज जलील यांचा आरोप, निवडणूक आयोग व पोलिसांना सवाल

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मध्ये पैसे घेऊन तीन दिवस ठाण मांडून बसले होते मतदारांनी पाडले नाही तर पैशामुळे पडलो असा आरोप इम्तियाज जलील यांनी शिंदे सेनेवर केला

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) काल झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मध्ये भाजपाच्या वतीने पैशाचा नंगा नाच केला गेला. निवडणूक आयोगाने पारदर्शक निवडणूक झाल्याचा दावा करत आहे या मतदारसंघात एवढी टक्केवारी झाली अशी माहिती दिली जात आहे. भाजपाने मतदारसंघात खुलेआम पैशांचे वाटप केले गेले. याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. मतदारांनी मतदान करु नये यासाठी पैसे देऊन बोटाला शाई लावण्याचे प्रकार घडले. जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर दुपारी एड अरविंद डोणगावकर या भाजपा पदाधिकारीचे कार्यालय आहे तेथे एजंटांमार्फत त्यांच्या कार्यालयात बुरखाधारी महीलांना पैशाचे वाटप सुरू असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. एजंटाला जवाहरनगर पोलिस ठाण्यात नेले तरीसुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल न करता सोडून दिले. पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे काम करणारे संविधानाचे रक्षण करणारे वकील डोणगावकर पैसे वाटतानाचा व्हिडिओ आम्ही सोशलमिडीयावर व्हायरल केला तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही. आंबेडकर नगर येथे महेंद्र सोनवणे व त्यांचा भावाने महीला मतदारांना पाचशे रुपये वाटप करुन भाजपाची निशाणी कमळावर मते देण्यासाठी परावृत्त केले. तो व्हिडिओ सुध्दा सोशल मीडियावर माझ्या पेजवर अपलोड केला. मतांचे सौदे करणाऱ्या दलित नेत्यांवर पत्रकार परिषदेत भडकले इम्तियाज जलील. भारतनगर येथील एका मतदान केंद्रावर भाजपाचे पदाधिकारी जालिंदर शेंडगे यांनी 50 ते 60 बोगस मतदार आणल्याची माहिती मिळाली म्हणून मी उमेदवार म्हणून त्या मतदार केंद्रावर गेलो. एका महीलेला रंगेहाथ पकडले त्यांच्याकडे मतदान कार्ड नव्हते. पोलिस त्या महीलेवर कारवाई न करता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मतदार केंद्रावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न जालिंदर शेंडगे व त्यांच्या गुंडांनी करत जय श्रीरामचे नारे लावत होते. हि जागा नारे लावायची आहे का...? या प्रकरणाची चौकशी करून जालिंदर शेंडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करता उलट पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. मग या सर्व व्हिडिओ पुरावा म्हणून निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तथा संबंधित विभागाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत औरंगाबाद पूर्वचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी केली आहे. यावेळी स्क्रीनवर सर्व व्हिडिओ पुरावे म्हणून माध्यमांसमोर दाखवले.

यावेळी प्रश्न विचारणारे न्यूज वन इंडियाचे पत्रकार कपिल जैस्वाल यांना धक्काबुक्की करत कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. याप्रसंगी इम्तियाज जलील त्या पत्रकारावर भडकले होते.

निवडणूक आयोगाला उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी भेट घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले निवडणूक आयोगाने पैसे वाटप करणा-या विरोधात कार्यवाही करण्यासाठी पथके नेमली होती. प्रत्येक मतदारसंघात हि पथके तैनात होती. नागरीकांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र एप सोशलमिडीयावर उपलब्ध करून दिले आहे. त्या एपवर आलेल्या तक्रारींचा निपटारा काही मिनिटांतच केला गेला. ज्यावेळी हि घटना घडली त्याचवेळी त्यांनी संपर्क करायला हवे होते. इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारी आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले नाही. लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस आयुक्त यांच्या मार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow