ब्राह्मण समाजासाने काढला विविध मागणीसाठी मोर्चा
ब्राम्हण समाजाला सोयी सवलती द्या
समाज बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा
औरंगाबाद,दि.(डि-24 न्यूज) ब्राम्हण समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने सोयी सवलती मिळवून द्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा व्हीआयपी रस्त्यावरील वंदे मातरम् सभागृहापासून काढण्यात आला. या मोर्चात ब्राम्हण समाजातील बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वातंत्र्यानंतर 1947 पासून ते आजपर्यंत ब्राम्हण समाज सर्व सोयी सवलतींपासून वंचित आहे. उलट या समाजावर शासन अन्याय करत आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. पण ब्राम्हण समाजाला हेतूपुरस्सर टाळण्यात आले आहे. ब्राम्हण समाज देखील आर्थीक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्या मान्य करुन सोयी सवलती द्याव्या अशी मागणी निवेदनाव्दारे विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे मंगळवारी करण्यात आली. ब्राम्हण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन लवकरात लवकर कार्यान्वित करावे, समाजातील विद्यार्थ्यांना बालवर्ग ते पदवी, पदवीत्तर उच्च शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षण मोफत द्यावे, विद्यार्थ्यांसाठी बार्टीसारखी स्वतंत्र स्वायत्त संस्था स्थापन करुन कार्यान्वित करावी, विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करावे, पुरोहितांना मानधन मंजूर करावे, विद्यार्थी व विद्यार्थीनींना मोफत शिक्षण करावे, याशिवाय शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि येण्या-जाण्यासाठी मोफत पास मिळावा, मागासवर्गीय समाजानुसार सोयी सवलती त्वरीत लागू कराव्या तसेच राजकारणातही इतर जातीप्रमाणे आरक्षण व संधी द्यावी अशा मागण्या निवदेनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी सुरेश मुळे, सचिन वाडे पाटील, गजानन जोशी, लक्ष्मीकांत दडके, आर.बी.शर्मा, मिलिंद दामोदरे, सुधाकर पुराणिक, सौ.गीता आचार्य , सौ.विजया अवस्थी, दिलिप देशमुख व शेकडो ब्राम्हण समाजातील लोक मोर्चात सहभागी झाले.
What's Your Reaction?