थकीत मालमत्ता करापोटी सिल्व्हर लाॅन्सला सिल ठोकले

 0
थकीत मालमत्ता करापोटी सिल्व्हर लाॅन्सला सिल ठोकले

थकीत मालमत्ता करापोटी सिल्वर लॉन सिल

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली मोहीम तीव्र स्वरूपात सर्व झोन कार्यालय येथे राबविण्यात येत आहे.

  या अनुषंगाने आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी झोन कार्यालय क्र. 1 सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 15 मिटमिटा येथील जोसेफ लुईस बापिस्ट यांचे सिल्वर लॉनची थकबाकी रक्कम 

20,64,016/- रुपये थकीत असल्याने सदर सिल्वर लॉन सील करण्यात आले. यावेळी पथक प्रमुख अविनाश मद्दी,अमीत रगडे, वसुली कर्मचारी विजय भालेराव, अश्फाक सिद्दीकी, शेख नईम यांनी कार्यवाही केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow