नायलॉन मांजा विक्रेत्यांची आता खैर नाही, कुरीयरने मागवलेला 6 लाखांचा मांजा पोलिसांनी पकडला...

 0
नायलॉन मांजा विक्रेत्यांची आता खैर नाही, कुरीयरने मागवलेला 6 लाखांचा मांजा पोलिसांनी पकडला...

नायलॉन मांजा विक्रेत्यांची आता खैर नाही...कुरिअरने आलेला ‘नायलॉन मांजा’ 6 लाखांचा मांजा पोलिसांनी पकडला...

6 लाख 14 हजार रुपयांचे 672 गट्टू जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - दुसऱ्याच्या नावावर असलेल्या मोबाईल सिमकार्डचा वापर करुन बोगस नावाने कुरिअर कंपनी मार्फत मागविलेला तब्बल 6 लाख 14 हजार 400 रुपये किंमतीचा नायलॉन मांजाचा साठा गुन्हेशाखा पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी राजाबाजार परिसरातील हिना पतंग मार्टच्या मालकासह 2 जणांविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर अहमद नजीर अहमद (वय 43 वर्ष), राहणार आजम कॉलनी, रोशनगेट परिसर, शेख फईम शेख नईम (वय 33 वर्ष), राहणार बाबर कॉलनी, कटकटगेट परिसर अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. पर्यावरणास आणि मानवी जीवितास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्याविरुध्द गुन्हेशाखा पोलिसांनी गेल्या दोन ते तीन दिवसापासून धडक कारवाईची मोहिम हाती घेतलेली आहे. मुकुंदवाडी परिसरातील डिलिव्हरी लिमिटेड कुरीअर सर्व्हिसेस येथे गेल्या महिनाभरापासून प्रदीप पाटील यांच्या नावाने बारा बॉक्स आले असून ते त्यांनी नेले नसल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. 

गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक संदीप काळे, पोलिस अंमलदार संदीप तायडे, कैलास काकड, दत्तात्रय गडेकर, मनोज विखनकर, विजय निकम, बाळू नागरे, विजय घुगे, प्रमोद सुरसे आदींच्या पथकाने मुकुंदवाडी परिसरातील डिलिव्हरी लिमिटेड कुरीअर सर्व्हिसेसच्या कार्यालयावर जावून महिनाभरापासून पडून असलेल्या 12 बॉक्सची झडती घेतली असता त्यात 6 लाख 14 हजार 400 रुपये किंमतीचे नायलॉन मांजाचे 672 गट्टू मिळून आले. पोलिसांनी सदरील नायलॉन मांजाचा साठा जप्त करुन त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक शोध घेतला असता तो जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील शेख युनूस शेख कय्यूम कुरैशी यांच्या नावे असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हिना पतंग मार्टचे मालक समीर अहमद नजीर अहमद आणि शेख फईम शेख नईम यांच्याविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow