नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या आरोपिंची काढली पोलिसांनी धिंड...
नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या आरोपिंची काढली धिंड...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - 8 डिसेंबरला अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या पथकाने कर्णपुरा मैदान, रेल्वेस्टेशन रोड परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे कोडीन सिरपचा दोन आरोपिंकडून 1,04,700 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. या कार्यवाईत सय्यद फेरोज सय्यद अकबर उर्फ (अंधा फेरोज), वय 30, राहणार चांदमारी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर, अयान शेख चांद शेख, वय 19, राहणार आरटीओ ऑफिसच्या मागे, वेदांत नगर, रेल्वे स्टेशन या दोघांना पथकाने अटक केली होती. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सायंकाळी त्यांची अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या वतीने आरोपिंची चाँदमारी परिसरात धिंड काढली. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, पोउनि अमोल म्हस्के, पोह लालखा पठाण, नवाब शेख, पोअ नितेश सुंदर्डे, सतीश जाधव, चालक काळे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?