भरदिवसा पेट्रोल पंपावर प्रियसिचा निर्घृणपणे खून, आरोपी अटक...!
भरदिवसा पेट्रोल पंपावर
पत्नीचा
निर्घृणपणे खून, आरोपी अटक...!
करमाड, दि.9(डि-24 न्यूज), करमाड जवळ शिवसमर्थ पेट्रोल पंपावर मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने खळबळ उडाली. पेट्रोल पंपावर काम करणारी तरुणी पूजा सुदाम गावंडे याला दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान धारदार चाकूने प्रियकराने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना सिसिटीवित कैद झाल्याने मन विचलित होत आहे. सत्यम रावसाहेब गावंडे असे प्रियकराचे नाव आहे. करमाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. नोव्हेंबर महिन्यात दोघांनी विवाह केला होता. त्यांच्यात नेहमी वाद विवाद होत होते. दोघे विभक्त राहत होते. खून का केला ते तपासात समोर येईल. अशी माहिती डि-24 न्यूजला पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
पोलिस चौकशित समोर आलेल्या माहितीनुसार मृत पूजा गावंडे यांचा जीवनप्रवास संघर्षाचा होता. पहिल्या पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असल्याने पेट्रोल पंपावर काम करत होती. 6 महीन्यापूर्वी चुलत दिर सत्यम सोबत आळंदी येथे लावून देण्यात आले होते. मात्र त्यांचे सुत जुळत नसल्याने नेहमी खटके उडत होते. यामुळे ते वेगळे राहू लागले होते. सत्यमला दुसरे लग्न करायचे होते म्हणून पुजाकडे घटस्फोट देण्याची सतत मागणी करत होता. पुजा घटस्फोट देण्यास नकार देत असल्याने वाद सुरू होते परंतु राग मनात असल्याने अखेर पुजाला संपवले.
What's Your Reaction?