काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी डॉ.सरताच पठाण यांच्या नावाला पसंती...!

 0
काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी डॉ.सरताच पठाण यांच्या नावाला पसंती...!

काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी डॉ.सरताज पठाण यांच्या नावाला पसंती...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - शहरात काँग्रेसला अच्छे दिन यावे व गतवैभव मिळवण्यासाठी सध्या प्रदेश कार्यकारिणीकडून प्रयत्न सुरू आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व विविध सेलचे अध्यक्ष निवडीसाठी सृजन अभियान सुरू केले आहे. काँग्रेसचे पर्यवेक्षक विवेक बन्सल हे जम बसवून शहरातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत आहे. काही कार्यकर्त्यांनी नवीन नेतृत्व व उच्च शिक्षित डॉक्टर सरताज पठाण यांना शहराध्यक्ष बनवावे म्हणून जास्त पसंती मिळत आहे. डॉ.सरताज पठाण यांचे कुटुंब मागिल तीन चार दशकांपासून काँग्रेस सोबत जोडलेले आहेत. तर ते सध्या प्रदेश सचिव आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. काते सध्या एसआयआर साठी खूप मेहनत घेत आहे. त्यांचे पक्ष संघटनेत व सामाजिक कार्य चांगले असल्याने त्यांना शहराध्यक्ष बनवावे अशी माहिती पर्यवेक्षक यांच्याकडे केली असल्याची माहिती एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. एका कार्यकर्त्याने सांगितले संकटाच्या काळात शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अनेक यशस्वी आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. त्यांना पक्षाने पुन्हा संधी द्यावी अशीही मागणी सृजन अभियान अंतर्गत करण्यात आली आहे. माजी शहराध्यक्ष इब्राहीम पठाण व एड सय्यद अक्रम, इंजिनिअर इफ्तेखार शेख हे सुद्धा शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 21 एप्रिल पर्यंत पक्ष श्रेष्ठीकडे अहवाल सादर करण्यात येणार आहेत त्यानंतर शहराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow