तापत्या उन्हात पोलिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन, अखेर बँक खात्यात स्टायफंड जमा

एआयएसएफच्या आंदोलनामुळे पोलीस भर्ती प्रशिक्षणार्थींचे थकीत स्टायफंड जमा... !
छत्रपति संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) आदिवासी विद्यार्थी पोलीस भर्ती प्रशिक्षणार्थींना दोन महिन्याचा मासिक भत्ता 20 हजार रुपये व कीटचे 5 हजार रुपये असे एकण 25 हजार रुपये ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या ( AISF ) आंदोलनामुळे सायंकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 175 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.
वंचित विद्यार्थ्यांसाठी AISF आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
याबाबत असे की, TRTI मार्फत चालवली जाणारी पोलिस पूर्व प्रशिक्षण योजने अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये स्टायफंड प्रमाणे दोन महिन्याचा स्टायफंड व 5 हजार रुपये कीटचे थकवलेले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रुमचे भाडे , मेसची फी इत्यादी साठी अडचण येत होती. खाजगी संस्था व TRTI ही टोलवा टोलवी करीत होते. अनेकवेळा निवेदने दिली. शेवटी आज ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ( AISF) तर्फे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन जाहीर करून तळपत्या उन्हात जवळपास 175 आदिवासी मुला मुलींनी दूपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्टायफंड आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहीजे, AISF जिन्दाबाद , इन्कलाब जिन्दाबाद इ. घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात
टीआरटीआय TRTI IGNITE अकॅडमीचे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अंमलबजावतील त्रुटीकडे लक्ष वेधण्यात आले. सदर योजनेअंतर्गत काही खाजगी संस्थांना प्रशिक्षणासाठी जबाबदारी देण्यात आली आहे,
परंतु या संस्थेकडून खालील प्रमाणे अनियमितता आढळून येत आहे.
विद्यार्थ्यांना शासनमान्य वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही, Ignite अकॅडमीला वारंवार विचारपूस केली असता आम्ही तुमची हजेरी वेळवर पाठवली असून मासिक भत्ता न पडण्याचे कारण TRTI संस्था जबाबदार आहे असे उत्तर IGNITE अकॅडमी कडून मिळत होते.
प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ सत्र घेतली जात आहेत.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार कोणताही पारदर्शक अहवाल दिला जात नाही.
गेली चार महिने लोटून गेले असून आत्तापर्यंत शासनामार्फत मिळणारे किट या त्याऐवजी निघालेल्या सूचना पत्रानुसार निधी आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला मिळाला नसून वारंवार IGNITE अकॅडमी कडे विचारपूस केली असता त्यासाठी TRTI संस्था जबाबदार आहे असे अकॅडमीचे प्रत्युत्तर मिळत आहे.
गेली चार महिने उलटून गेले परंतु विद्यार्थ्यावर होणारे शोषण हा वाढत चाललेला आहे परंतु टीआरटीआय TRTI संस्थे मार्फत कोणताही अधिकारी IGNITE अकॅडमी छत्रपती संभाजीनगरला येऊन विद्यार्थ्यांना भेट दिली नाही किंवा कोणतीही विचारपूस केलेली नाही.
आमची दोन महिन्याची मासिक भत्ता म्हणजे 16/2/2025 ते 16/3/2025 व 16/3/2025 ते 16/4/2025 व किटचे पैसे दोन दिवसात मिळाले पाहिजे.
ह्या सर्व आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर दोन दिवसात परत ignite अकॅडमी औरंगपुरा ते आदिवासी विकास विभाग जात पडताळणी कार्यालय सिडको पर्यंत तीव्र निषेध करत मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देत दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सायंकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 175 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 25 हजार रुपये जमा झाले. वंचित विद्यार्थ्या साठी AISF आंदोलन सुरूच ठेवणार असेही सांगण्यात आले आहे.
या निदर्शनात एआयएसएफचे राज्य कौन्सिल सदस्य अनंता कऱ्हाळे, संघटक मधूकर गायकवाड ,तुषार मडावी दादाराव लाखाडे, कृष्णा वानोळे, सचिन लाखाडे, अंकुश पाणबुडे, सचिन रिठे, प्रसाद मुकाडे, गणेश भुरके, यादव भडंगे, सचिन खरोडे, कृष्णा मुकाडे, दीपक पिंपरे, सारिका काळे, पुनम गुहाडे, पायल पवार, पायल बोडके, दिपाली पाचपुते, वालवी लीला, सपना ठोंबरे, गायकवाड, पूजा भामरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मंडपवाल्याला धमकावल्याने तो घाबरून पळून गेला त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसभर 42°C उन्हात बसावे लागले. यावेळी सदर अधिकाऱ्यांच्या अमानवी वर्तनाचा धिक्कारही करण्यात आला.
What's Your Reaction?






