औरंगाबाद... पंतप्रधान आवास योजनेसाठी केले सादरीकरण
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सादरीकरण
औरंगाबाद ,दि 23(डि-24 न्यूज) प्रधानमंत्री आवास योजना परवडणारे घरे (AHP) शहरी घटक या योजनेअंतर्गत महानगरपालिका मार्फत विविध जागांवर पीपीपी मॉडेलवर घरे विकसित करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आले होते.
यासंदर्भात विविध विकासक, गुत्तेदार आणि वास्तुविशारद यांनी कोणत्या साइटवर अंदाजीत किती घरे बांधता येईल याबाबतचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्यासमोर आज केले.
सुंदरवाडी या साईट साठी एलोरा कन्स्ट्रक्शन यांनी अंदाजे 3288 फ्लॅट्स तर जागृत सारा यांनी सदरील साइटवर अंदाजे 3100 फ्लॅट्स बांधून देण्या संदर्भात सादरीकरण केले. याशिवाय तिसगाव गट क्रमांक 225/1 या साइटवर सहकार जेव्ही या गुत्तेदारांनी अंदाजे 1976 तर जागृत सारा या गुत्तेदारांनी 1968 फ्लॅट बांधून देण्याचे सादरीकरण केले.
तीस गाव गट क्रमांक 227/1 या साइटवर एलोरा कन्स्ट्रक्शन यांनी 4680 फ्लॅट्स, पडेगाव गट क्रमांक 69 येथे लक्ष्मी जेव्ही यांनी 672 फ्लॅट आणि हर्सूल गट क्रमांक 16 येथे के एच इन्फ्रा आणि सारा इन्फ्रास्ट्रक्चर यांनी अंदाजे प्रत्येकी 504 फ्लॅट बांधून देण्याबाबतचे सादरीकरण प्रशासक यांच्यासमोर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त-2 अपर्णा थेटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहूळे, दक्षता विभाग कक्ष प्रमुख एम बी काझी, उप अभियंता नगररचना विभाग शिरसाट, रामदासी, कनिष्ठ अभियंता आरती नवगिरे, फफाळे, मुंडे आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?