औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमेर अब्दुल सलीम इच्छुक

 0
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमेर अब्दुल सलीम इच्छुक

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमेर अब्दुल सलीम इच्छुक

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज) युवक काँग्रेसच्या विविध पदांवर काम करत असताना व शहरात सामाजिक कार्यांत नेहमी अग्रेसर असलेले युवा, उच्चशिक्षित महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव आमेर अब्दुल सलीम यांनी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी आपला इच्छुक असलेला उमेदवारी अर्ज पक्षाचे कार्यालय गांधी भवन येथे

काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्याकडे दाखल केला.

यावेळी माजी नगरसेवक एजाज झैदी, फैयाज हुसेन, शेख सईद, मोईन कुरेशी, अखिल पटेल, लियाकत पठाण, अनिल पारखे, इंजिनिअर मोहसीन खान, शेख शफीक सरकार, शेख फैज, शेख शोएब, शेख अयाज, शेख इब्राहिम, रेहान खान व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमेर अब्दुल सलिम यांचा परिचय...

आमेर हे औरंगाबाद शहराचे दोन वेळा आमदार व मंत्रीपदावर काम केलेले अब्दुल अजीम यांचे नातू आहे. माजीमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांचे कट्टर समर्थक आहेत. गेल्या 14 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. सन 2014 ते 2018 पर्यंत औरंगाबाद मध्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. सन 2018 ते 2021 पर्यंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे निवडून आलेले प्रथम महासचिव तसेच दुस-यांदाही महासचिव पद भूषविले. युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी म्हणून परभणी, बुलढाणा, जळगाव, वर्धा, पुणे ग्रामीण येथे यशस्वीपणे कामगिरी केली. युवा नवीन चेहरा असल्याने पक्षाने काँग्रेसची उमेदवारी द्यावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow