स्मार्ट मीटरची वायर उघडी ठेवणा-या ठेकेदार व महावितरणच्या अधीका-यांविरोधात गुन्हा दाखल...

स्मार्ट मीटरची वायर उघडी ठेवणाऱ्या एनसीसी ठेकेदार व महावितरण अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर... !
भाकप पीडित आचलच्या पाठीशी खंबीर... !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) वाळूज दिनांक 18 जून 2025 ; वाळूज येथील आजोबा नगर मध्ये एनसीसी ठेकेदारांनी स्मार्ट मीटर टीओडी लावताना वायर उघडीच ठेवली ज्यामुळे आचल संदीप अस्वले, वय 8 वर्ष हिस विजेचा तीव्र झटका लागल्याने ती चिटकली व गंभीर जखमी झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवेदन दिल्यानंतर तातडीने वाळूज पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर नोंदवून संबंधित महावितरण अधिकारी एनसीसी ठेकेदार व त्यांचे कर्मचारी यांच्या विरोधात निष्काळजीपणा करून जीवितास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला.
याबाबत असे की, दि . 15/06/2025 रोजी सायंकाळी 07:10 वाजता आजवानगर , वाळुज , ता. गंगापूर , जि . छ . संभाजीनगर येथे आचल संदिप अस्वले , वय 8 वर्ष ही खेळत असतांना नितीन गोरखनाथ बत्तीसे यांच्या घरासमोरील विजेच्या खांबाला निष्काळजीपणे लावलेले स्मार्ट / टि.ओ.डी. मिटरच्या बॉक्स व त्याच्या लोखंडी पट्टीमध्ये विजप्रवाह तसाच चालु राहील्याने त्या बॉक्सला चिटकली , सदर एनसीसी ठेकेदार व महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आचलला विजेचा तीव्र झटका लागल्याने तिच्या जीवीतास धोका निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आजु - बाजुच्या लोकांनी लाकडी दांड्याने तिला सदर विज प्रवाहापासुन वेगळे केले व अत्यावस्थ असतांना तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय , छ . संभाजीनगर येथे अॅडमिट केले. तिचा एक हात व एक पाय निट काम करत नाही . तिला चालता येत नाही , वर्तमानात व भविष्यात महावितरण व सदर ठेकेदार व इत्यादींच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या विजेच्या झटक्यामुळे अपंगत्व येण्याची शक्यता आहे. सदर मुलीच्या वडिलांची तक्रार आजपर्यंत नोंदवुन घेण्यात आली नव्हती. ठेकेदार उलट तक्रारदारालाच 353 कलम लावण्याच्या धमक्या देत होते. तेव्हा तातडीने सदर ठेकेदार त्याचे कर्मचारी , महावितरणचे अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांचेविरूध्द आचल संदिप अस्वले , वय : 8 वर्ष हिस वरील ठेकेदार व अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे विजेचा प्रवाह सुरूचं राहील्याने गंभीर दुखापत झाली , तिच्या जिवीतास धोका निर्माण झाला व तिला कायमचे अपंगत्व निर्माण होण्याचाही धोका निर्माण झाला. याबाबत गुन्हा दाखल करावा व न्याय द्यावा ही नम्र विनंती . अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही या निवेदनाव्दारे देण्यात आला. वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी तातडीने निवेदनाची दखल घेऊन ठेकेदार व इतर आरोपींना विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे प्रथम खबर नोंदवण्यात आली, भाकपतर्फे आचलच्या पुढील उपचारासाठी शिक्षणासाठी अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई द्यावी , एनसीसी कंपनीचा ठेका रद्द करावा स्मार्ट टीओडी मीटर काढून घ्यावे व इथून पुढे लावू नयेत यासाठी महावितरणच्या व्यवस्थापकीय सहसंचालकांना निवेदन ही देण्यात येणार आहे. आज वाळूज पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनावर ऍडव्होकेट अभय टाकसाळ भाकप राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड रतन अंबिलवादे, तालुका सह सेक्रेटरी गंगापूर कॉम्रेड इब्राहिम पटेल, कॉम्रेड विठ्ठल त्रिभुवन, शाखा सचिव वाळूज कॉम्रेड शेख नूर, शाखा सचिव तुर्काबाद, कॉम्रेड संतोष काळे, संदीप अस्वले इत्यादींच्या सह्या आहेत.
What's Your Reaction?






