संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी नवरात्र महासंघाचे कार्य उल्लेखनीय - किशोर शितोळे

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी नवरात्र महासंघाचे कार्य उल्लेखनीय
भाजपा शहराध्यक्ष किशोर शितोळे यांचे प्रतिपादन
नवरात्र महासंघाच्या वतीने रक्तदान शिबिरात पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.26(डि-24 न्यूज):- टीव्ही, मोबाईल आणि समाज माध्यमांच्या जाळ्यात आपण सर्वच अडकत चाललो आहोत. पूर्वी होणारा एकमेकांमधला संवाद आजच्या तांत्रिक युगात दुरावत चालला असून धार्मिक आणि अध्यात्मिक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी स्थापन केलेल्या जिल्हा सार्वजनिक नवरात्र उत्सव महासंघाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन भाजपाचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी शुक्रवारी (दि.26) केले. जिल्हा सार्वजनिक नवरात्र उत्सव महासंघाच्या दुर्गा मातेच्या आरती प्रसंगी ते बोलत होते. उपस्थित मान्यवरांचे महासंघाच्या अध्यक्षा मनीषा संजय भन्साळी यांनी स्वागत केले.
सार्वजनिक नवरात्र उत्सव महासंघाच्या दुर्गा मातेची आरती प्रसिद्ध उद्योजक सुकेतू पटेल व श्रीमती भूमी पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महासंघाचे विधिज्ञ महासचिव कल्याण खोले पाटील, उपाध्यक्ष संजय संचेती, समाधान जरांगे, सरचिटणीस विनोद माने, उपाध्यक्ष स्मिता साहूजी, पारस जैन, संजय भन्साळी, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, सिद्धार्थ पाईकराव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, संतोष कावले, सचिन मिसाळ, कुलदीसिंग मिरह, राजेश मेहता, नंदकिशोर हातोळे यांची उपस्थिती होती.
नवरात्र महासंघाच्या वतीने रक्तदान शिबिरात पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नवरात्र उत्सव महासंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 50 हुन अधिक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले. लायन्स ब्लड बँकेचे डॉ. प्रकाश पाटणी, जनसंपर्क अधिकारी श्यामराव सोनवणे, फिरोज शेख, चंद्रविलास नागूला यांनी रक्त संकलनासाठी पुढाकार घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
What's Your Reaction?






