मनपाने ठोकले एका मंगल कार्यालयाला टाळे...!
 
                                थकीत मालमत्ता करापोटी मंगल कार्यालयाला टाळे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.17(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या झोन क्रं 4 च्या पथकाने थकीत मालमत्ता करापोटी हर्सूल रोड येथील मंगल कार्यालय सिल केले आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरातील रहिवासी व व्यावसायिक मालमत्ता धारकांकडून थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
आज उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रं.4 सहायक आयुक्त अशोक गिरी यांच्या नेतृत्वात झोन क्र.4 अंतर्गत हर्सूल रोड येथील मथुरा लॉन्स यांचे कडील थकीत मालमत्ता कर रू. 43,30,048/- बाबत आज सिल करण्यात आले.या ठिकाणी दि.20 डिसेंबर रोजी मोठे मंगल कार्यालय होणार होते यांकरिता मोठा मंडप टाकण्यात आला होता.सदरील मंडप काढून टाकण्यात येऊन सदर मंगल कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे.
सदरील कारवाई कर अधीक्षक भोसले, विशेष कर अधिकारी जी व्ही जाधव व पथक कर्मचारी यांनी पार पाडली.
मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कराचा त्वरित भरणा करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            