अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे जावे - डॉ. अब्दुल कदीर

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे यावे - डॉ.अब्दुल कदीर
मस्जिदमध्ये स्टडी सेंटर सुरू करण्याचा उपक्रम, शहरात उघडणार शंभर स्टडी सेंटर, बिदरच्या बेटरमेंट फाऊंडेशनने अर्थसहाय्य केले सफा बैतूल मालच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.17(डि-24 न्यूज) देशातील अल्पसंख्याक समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षणात प्रगती करुन आपल्या मुलांना शिक्षणाकडे लक्ष देऊन उच्चशिक्षित करावे तरच देशाची प्रगती होईल. लग्नसमारंभात व विविध कार्यक्रमात पैशाची उधळपट्टी न करता ते पैसे शिक्षणावर खर्च करण्याचे नियोजनाची आज गरज आहे. जेव्हा लहान बालके शिक्षण घेतात तेव्हापासून त्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी वातावरण निर्माण करावे. वाईट सवईकडे मुले जाणार नाही यासाठी त्यांना व्यस्त कसे करता येईल व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन एका कार्यक्रमात बीदर येथील शाईन ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संस्थापक तथा शिक्षातज्ञ डॉ.अब्दुल कदीर यांनी केले आहे.
त्यांनी अर्थसहाय्य करत दलालवाडी येथील रोशन मस्जिदच्या दुसऱ्या मजल्यावर स्टडी सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले अल्पसंख्याक समाजातील बालकांना घरी अभ्यास करण्यासाठी जागा अपुरी असते म्हणून असे स्टडी सेंटर त्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकतात. धार्मिक स्थळाचे उपयोग शिक्षणासाठी व्हावे यासाठी शहरातील शंभर मस्जिदमध्ये स्टडी सेंटर स्थापन करण्याचा मानस आहे यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरीकांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
या स्टडी सेंटर मध्ये फोल्डिंग स्टडी टेबल त्यांनी बालकांना अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने मस्जिद कमेटी व परिसरातील नागरीकांनी आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन सफा बैतूल मालचे मुफ्ती अनिसुर्रहमान यांनी केले.
याप्रसंगी ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, शाहेद आरटीओ, मस्जिद कमेटीचे अध्यक्ष हाजी कमरोद्दीन, सेक्रेटरी हाजी अब्दुल कादीर, हामिद भाई, अय्यूब सेठ, कारी मुस्तफा, मौलाना अब्दुल अजिम नदवी, बहादुर पटेल, ताहेर भाई आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






