पत्रकाराला शिविगाळ करुन मारहाण, कार्यवाही करण्याची पत्रकार संघटनेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पत्रकाराला शिविगाळ करुन मारहाण, कार्यवाही करण्याची पत्रकार संघटनेची पोलिस आयुक्तांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) भ्रष्टाचाराची बातमी प्रकाशित केली म्हणून एका साप्ताहिकाचे संपादक बाजीराव सोणवने यांचा मोबाईल हिसकावून शिविगाळ करुन मारहाण झाल्याने सिटीझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपिस अटक करण्याची मागणी आज निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुंदर सोनाजी वाघमारे यांनी हि मारहाण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजमत पठाण, संपादक बाजिराव सोनवणे, नजमोद्दीन काझी, बबनराव सोनवणे, यश सोनवणे, राज ठाकरे, रतनकुमार साळवे, प्रमोद कुमार एस प्रधान, दिनेश परदेशी, प्रविण बोर्डे, शेख शफी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






