मोफत उपचारपद्धतीचे सरपंचांनी मानले आभार, सरपंच मेळाव्यात सूर...!
मोफत उपचारपद्धतीचे सरपंचानी मानले आभार.
CSMSS वैद्यकीय रुग्णालय येथे सरपंच मेळावा संपन्न.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)
लिंबे जळगाव, ता. गंगापूर येथील अजित सीड्स प्रा. लि. संचलित प्रस्तावित CSMSS वैद्यकीय आणि रुग्णालय येथे सोमवार आणि मंगळवारी तालुक्यातील जवळपास 155 पेक्षा अधिक सरपंच आणि उपसरपंच यांचा मेळावा शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, आदर्श सरपंच श्री. भास्कर पेरे पाटील, CSMSS वैद्यकीय आणि रुग्णालय संचालिका सौ. स्नेहल समीर मुळे आणि CSMSS वैद्यकीय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि सरपंचांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले की श्री. पद्माकर मुळे सातत्याने विविध समाजपयोगी उपक्रम निःस्वार्थी भावनेने अनेक वर्षांपासून राबवत आहेत. CSMSS वैद्यकीय आणि रुग्णालयानी रुग्णासाठी मोफत योजना सुरू केली असून यामध्ये रुग्णांकडून कुठल्या प्रकारची फी आकारली जाणार नसून अल्प दरात विविध उपचार उपलब्ध असणार आहे. 'निरोगी महाराष्ट्र' चा संकल्प साध्य करण्यासाठी राज्यात विविध रुग्णालयामध्ये सातत्याने असे समाजपयोगी आणि रुग्णांसाठी उपचार पद्धती राबविली जातात. नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आपल्या घराजवळ सहज साध्य आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर CSMSS वैद्यकीय आणि रुग्णालय सातत्याने प्रयत्न करीत असून त्यासाठी विविध उपचार पद्धती आणि उपाययोजना राबवित आहेत. त्याचं डॉ. सुक्रे यांनी मनापासून कौतुक केले.
सरपंचाच्या वतीने श्री. भास्कर पेरे पाटील यांनी या हॉस्पिटलच्या महाशिबीरामध्ये रूग्णांची मोफत बाहयरूग्ण व आंतररूग्ण तपासणी करण्यात येत असून यामध्ये रक्त, लघवी तपासणी, आरोग्य तपासणी, एक्स-रे, ई. सी. जी. डोळयांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी, गर्भधारणा बंदी, नसबंदी, बाळंतपण, लसीकरण, काँट्रासेप्टिव डिव्हाईसेस, लोअर सेगमेंट सिझेरियन डिलिव्हरी मोफत केल्या जात आहेत. तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असतील, त्यांची अल्पदरामध्ये शस्त्रक्रियाही करण्यात येत आहेत. या सर्व अत्याधुनिक सुविधांचा सरपंचानी आपापल्या गावामध्ये जनजागृती करून रुग्णांना जास्तीत जास्त माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी CSMSS वैद्यकीय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, सौ. अलका कीर्तिशाही, कारभारी गायके, कृष्णा कीर्तिकर, प्रमोद पवार, रामनाथ पाटेकर, नासेर पटेल, नवनाथ वैद्य, करुणा पौळ, बाबासाहेब चव्हाण, शिवम जाधव, अशोक नवथार, अख्तर शेख यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले. आभार डॉ. सुभाष भोयर आणि डॉ. महेश घुले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. कैलास तिडके यांनी केले. सरपंच मेळावा यशस्वीतेसाठी विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे, डॉ. यशवंत गाडे, डॉ. सुहास बावीकर, डॉ. स्मिता पाटणे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रताप जाधव, डॉ. नारायण सानप, श्री. सुधीर नेहूल, डॉ. राजेंद्र प्रधान, अशोक आहेर, सदाशिव आहेर, संजय अंबादास पाटील, डॉक्टर आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
नाव नोंदणीसह मोफत उपचारासाठी खालील दिलेल्या नंबरवर 0240- 2993999, 2994999
संपर्क साधावा.
स्थळ : अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित प्रस्तावित CSMSS वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, लिंबेजळगाव टोलनाक्याच्या बाजूला, पुणे- छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग, लिंबे जळगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.
What's Your Reaction?