अंबड येथील सकल मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन
अंबड शहरातील सकल मुस्लिम बांधवांच्या वतीने राज्यपाल यांना अंबड तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन...
अंबड, दि.19(डि-24 न्यूज) कोल्हापूर जिल्हयातील विशालगड गाजापुर येथे 14 जुलै रोजी घडलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली काही समाज कंटकांनी मुस्लिम बांधव यांना मारहाण करून धार्मिक स्थळाची नुकसान करून धार्मिक ग्रंथाची विटंबना केली. धार्मिक ग्रंथ पवित्र जाळले, यामुळे सकल मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. समजाच्या वतीने त्या घटनेचा तीव्र निषेध करत सरकारकडे काही मागण्या मांडण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे सर्व हल्लेखोरांवर UAPA कायद्या अंतर्गत करवाई करण्यात यावी. घटनेशी संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. हल्ल्यात झालेल्या नुकसानभारपाई करण्यात यावी. मुस्लिम समाजाला संरक्षण देणारे कायदे तयार करून सुरक्षा प्रदान करावी. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. सदरील घटनेची C.I.D मार्फत चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना पुनश्च घडू नये या साठी शासनाने खबरदारी घ्यावी. अशा आशयाचे निवेदन राज्याचे राज्यपाल यांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून अंबड तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, तारेख चाउस, समद बागवान, खुर्शीद जिलानी, जाकेर डावरगांवकर, शेख फेरोज़, नाजा हाश्मी, ॲड.अफरोज पठाण(शहराध्यक्ष रा.कॉ.पार्टी अंबड़), केदार कुलकर्णी, मौलाना सादेख मजाहिरी, नसीर बागवान, अनवर कुरैशी, मोहसीन हाश्मी, सलीम बागवान, मुस्तकीम पटेल, शेख समीर, अकबर खान, अर्जून भोजने, अक्रम बागवान, युसुफ मनियार, मजहर हाश्मी, शेख शाम्मद, हाजी फेरोज़, व सकल मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
What's Your Reaction?