उद्याचे राज्यव्यापी एमआयएमचे आंदोलन शांततेत होईल - इम्तियाज जलील
उद्या होणारे एमआयएमचे राज्यव्यापी आंदोलन शांततेत होईल - इम्तियाज जलील
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज) उद्या कोल्हापूर विशालगड येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी एमआयएम राज्यव्यापी आंदोलन दुपारी तीन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शांतपणे करणार आहे.
हे आंदोलन राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयासमोर एमआयएमचे कार्यकर्ते करणार आहे. या आंदोलनात हुल्लडबाजी न करता शांतपणे करुन प्रशासनाला सहकार्य करुन निवेदन देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांची या आंदोलनासाठी परवानगी घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की अगोदर पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. बैठकीत त्यांना सांगितले की हे आंदोलन शांततेत केले जाईल. कायदा हातात घेतला जाणार नाही. कार्यकर्त्यांनाही त्यांनी आवाहन केले लोकशाही मार्गाने शांतपणे हे आंदोलन करायचे आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले जाईल. याची शाश्वती दिली आहे.
What's Your Reaction?