मी अगोदर हिंदूस्थानी, माझ्या नावाने निवडणूक लढण्यासाठी भाजपा मुद्दा बणवत आहे- रशीद खान मामू
मी अगोदर हिंदूस्थानी, माझ्या नावाने निवडणूक लढण्यासाठी भाजपा लाचार - रशीद खान मामू
माझ्यावर आरोप लावणा-यांनी पुरावे द्यावे, आरोप करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार, उध्दव ठाकरे खरे हिंदूत्ववादी, खैरे आमचे नेते त्यांची नाराजी दूर करणार...शहराचे नामांतर झाल्याने नवीन नाव घ्यावेच लागेल आम्ही कायदा पाळणारे लोक आहेत...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - भाजपा माझ्या नावाने छत्रपती संभाजीनगर महापालिका व महाराष्ट्रातील निवडणूका लढण्यासाठी मामूंचा वापर करण्यासाठी लाचार झाली आहे. मी जातीयवादी दाखवण्याचा अपप्रचार केला जात आहे. मी पाकिस्तान जिंदाबाद बोललो, वंदेमातरम गिताला विरोध केला. 1988 च्या दंगलीतील आरोपी आहे सिध्द करुन दाखवावे. जे मंत्री अतुल सावे यांचे नाव न घेता ते लहान होते तेव्हापासून मी राजकारणात आहे. उबाठात प्रवेशामुळे राजकारण करु लागले कोणत्याही हिंदू धर्मातील व्यक्तीने माझ्या प्रवेशाला विरोध केला नाही. चंद्रकांत खैरे यांच्याशी जो वाद झाला ते आणि मी एका पक्षातील आहे बसून त्यांची नाराजी दूर करु. मुंबईत बोलतात खान महापौर बणून जाईल आणि आता मामू यांना आयते भेटले त्यांना माहीत नाही मामा नसले तर लग्न पण होत नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. भाजपाच्या नेत्यांनी मला प्रसिध्दी देवून महाराष्ट्राचा नेता बणवले. खरे हिंदूत्ववादी नेते उध्दव ठाकरे आहे ते सर्वांना सोबत घेऊन चालतात म्हणून धर्मनिरपेक्ष पक्ष त्यांच्या सोबत आहे. सोशल मिडिया वर दोन समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट व बदनामी करणा-यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
माझा राजकीय जीवनाचा प्रवास मराठवाडा आंदोलनातून झाला. महापौर झालो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले चांगले महापौर भेटले यांना त्रास देवू नका. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तेव्हा आमदार, खासदार होते त्यांनीही सहकार्य केले. त्यांचा गैरसमज झाला म्हणून ते त्यादिवशी संतप्त झाले होते. तो वाद आम्ही बसवून मिटवणार आहे विरोधकांनी राजकारण करु नये.
मराठवाडा आंदोलनात स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई सराफ, रमनभाई, अनंत भालेराव, कापडिया, देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी रशीद खान मामू, स्व.गोपिनाथ मुंडे, स्व.प्रमोद महाजन, डॉ.भालचंद्र कांगो, एड मनोहर टाकसाळ, साथी सुभाष लोमटे, कापडिया यांची मुलगी, हबीबुल्लाह, असदुल्लाह तयार झालो. त्यानंतर श्रीगणेश महासंघात मनमोहन अग्रवाल, दादा गणोरकर, खटोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मी रशीद खान मामू, माणिक गंगवाल, शिवनाथ राठी, ओमप्रकाश वर्मा सोबत काम केले. श्रीगणेश महासंघाला 50 वर्षे पूर्ण झाली असल्याने माझा महासंघाने सत्कार केला. गणेशमूर्ती विसर्जन व डॉ.बाबासाहेब पुतळा विटंबनेची त्याकाळी घटना घडली शांतता प्रस्थापित करण्यासाठी मला शासनाने प्रमाणपत्रे देवून गौरव केला. सर्व जाती धर्माचा मी आदर करतो सर्वांच्या सुखदुःखात जातो. संघाचे शर्मा हे माझे गुरू आहे त्यांनी मला भाषण करणे शिकवले. त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहे. 1988 च्या दंगलीचा माझ्यावर आरोप लावता सिध्द करुन दाखवावे माझ्यावर युनियन व राजकीय गुन्हे आहेत. मी दंगलीत हिंदूंचे जीव वाचवले. कुलकर्णी यांची पत्नी, चांदिवाल यांचे वडिल यांनी आगीतून काढले. दंगलीत साहुजी आणि पहेलवान यांना घरी सोडले. भाजपाचे राजकीय हिंदूत्व आणि उबाठाचे धार्मिक हिंदूत्व आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
खैरे आणि माझ्यात वाद झाल्यानंतर अनेक फोन आले परंतु मी उबाठात राहणार आहे उमेदवारी मिळो अथवा न मिळो. एमआयएम व एड प्रकाश आंबेडकर यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली परंतु मी उबाठात जाण्याचा निर्णय घेतला. इम्तियाज जलिल हे उबाठात जाण्याच्या अगोदर त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली असती तर विचार केला असता मी पक्षात प्रवेश केला आहे धर्मांतर नाही. वाद झाल्यानंतर सर्वांना माझी आठवण येते आहे अगोदर आली नाही. उबाठात येण्याचा योग्य निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?