ऐतिहासिक शहराची ओळख मिळवून देण्यासाठी मला मतदान करावे - हिशाम उस्मानी
 
                                ऐतिहासिक शहराची ओळख मिळवून देण्यासाठी मला मतदान करावे - हिशाम उस्मानी
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) गढुळ झालेल्या राजकारणामुळे माझ्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव आपल्या राजकीय स्वार्थासाठी बदलण्यात आले. जे पक्ष स्वतःला सेक्युलर समजतात त्यांनी व जाती धर्माच्या नावाखाली मते मागणा-या पक्षांचा पण नामांतराला पाठिंबा होता. सेक्युलर पक्षांनी साॅफ्ट हिंदुत्व स्विकारुन जातीय तेढ निर्माण करणा-या पक्षांच्या एजंड्यावर काम करत असल्याने माझा या राजकीय पक्षांवर विश्वास नसल्याने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात मतदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ऐतिहासिक शहराला ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी राजकीय लढाई लढत आहे. अगोदर शहराचे नाव वाचवण्यासाठी न्यायालयात लढलो. आता राजकीय लढा देऊन मतदारांनी शिलाई मशीन समोरील बटन दाबून विजय मिळाला तर प्रामाणिकपणे औरंगाबादचे नाव परत मिळवून देण्यासाठी आवाज विधानसभेत उठवणार आहे. प्रचारात जेवढे शक्य झाले त्या मतदारांना भेटलो. निवडणूक लढण्याचा उद्देश सांगितला. विरोधकांनी प्रचारात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरीही ज्या मतदारांपर्यंत पोहोचलो नाही त्यांच्याशी क्षमा मागतो. मतदार संघात एकोपा, भाईचारा कायम राहावे. रोजगाराचे नवनवीन संधी, शैक्षणिक, औद्योगिक व पर्यटन वाढीसाठी नवनवीन संकल्पना राबवणार आहे. दररोज पाणी पुरवठा कसा होईल, रस्ते, महीला सुरक्षा, दलित अल्पसंख्याक बहुल वार्डाचा सर्वांगिण विकास, आरोग्य व शिक्षणाची मोफत सोय कशी उपलब्ध करून देता येईल. घरकुल योजनेचा लाभ गरीबांना मिळवून देण्यासाठी व विकासपुरुष डॉ.रफीक झकेरिया यांनी जो ऐतिहासिक शहराचा विकास केला त्या मार्गाने विकास करण्याचा ध्यास घेतला आहे म्हणून मला या निवडणुकीत जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे आवाहन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक व्हिडिओ जारी करुन औरंगाबाद मध्यचे उमेदवार हिशाम उस्मानी यांनी केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले मी आपल्या प्रचारात कोणावर टिका टिप्पणी केली नाही. जाती धर्मात जातीय सलोखा कायम राहावे यासाठी नेहमी प्रयत्न केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना मतांचा अधिकार दिला आहे तो योग्य वापर करावा. माझ्यासारख्या उच्चशिक्षित व विकासाचे व्हिजन ठेवणा-या व गांधीवादी विचाराच्या उमेदवाराला आपण विधानसभेत पाठवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. असे जारी केलेल्या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            