243 गुन्ह्यात चोरी गेलेला 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत, ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

 0
243 गुन्ह्यात चोरी गेलेला 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत, ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

243 गुन्ह्यात चोरी गेलेला 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीना परत

पोलीस प्रशासनाची कामगिरी उल्लेखनीय-पालकमंत्री संदिपान भुमरे

      

औरंगाबाद,दि.10(डि-24 न्यूज) जिल्ह्यात 242 चोरीच्या गुन्ह्यातील 5 कोटी 71 रुपये फिर्यादींना तपास करून परत केल्याची पोलीस प्रशासनाची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगून राज्याचे रोजगार पण फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल फिर्यादीना हस्तांतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 5 कोटी 71 लाख रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल येथे नागरिकांना हस्तांतरीत केला.

कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला वाहन, विश्रामगृह इमारत, पोलीस स्टेशन उभारणीसाठी व निजामकालीन पोलीस स्टेशनच्या दुरुस्तीसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी सांगितले .         

शहरातील व ग्रामीण भागातील सुरक्षा यंत्रणा सज्ज राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या वाहनांची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्यापूर्वी मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना परत मिळवून दिल्याबद्दल ही दिवाळी आनंदाने साजरी होईलअसे सांगून त्यांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले. आमदार प्रदीप जयस्वाल जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेश मंडळाचे पदाधिकारी, नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील यांच्यासह मुद्देमाल घेण्यासाठी आलेले फिर्यादी , पोलिस विभागाचे विविध अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते . विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले की जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत 5 कोटी 71 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस विभागाने सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून हा आनंद सर्वसामान्य नागरिकांना आनंद मिळवून देण्याची ही संधी महत्त्वपूर्ण आहे यातून पोलीस यंत्रणा विषयी सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण होऊन , शांतता , कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम पोलीस प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow