विकसित भारत संकल्प यात्रेचे सर्व विभागाने समन्वयाने नियोजन करावे - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

 0
विकसित भारत संकल्प यात्रेचे सर्व विभागाने समन्वयाने नियोजन करावे - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

विकसित भारत संकल्प यात्रा...

 सर्व विभागांनी समनव्याने नियोजन करावे-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय,             

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांना लाभ पोहोचविण्यासाठी विकसित संकल्प भारत यात्रा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यांनी आज दिले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, होते. अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे , निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महानगरपालिकचे उपायुक्त रणजीत पाटील, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख,आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, सर्व विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. 

      बुधवार दि.15 नोव्हेंबर पासून ही यात्रा सुरु होणार असून ते 26 जानेवारी 2024 पर्यंत ही यात्रा राज्यात विविध जिल्ह्यात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर पासून यात्रेचा प्रारंभ होत असून लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या संदर्भात सर्व विभागांनी नियोजन करावे, शहर ,ग्रामीण तसेच आदिवासी विकास विभाग,बँका यांनी समन्वयाने नियोजन करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा.

     

विकसित भारत संकल्प यात्रेसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून शहर भागात महानगरपालिका आयुक्त,तर ग्रामीणसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तसेच या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे कार्यान्वयन अधिकारी आहेत. सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. या संकल्प यात्रेच्या अनुषंगाने नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबतही वेळीवेळी आढावा घेतला जाणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावे. यात्रेच्या उपक्रमबाबत जनजागृती करावी, असे निर्देशही देण्यात आले.

समाविष्ट योजनांची नावे:-

 प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, उज्वला, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया ,आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत मिशन, पीएम किसान योजना,आयुष्यमान भारत , उजाला , खेलो इंडिया ,किसान क्रेडिट कार्ड, हर घर नल से जल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow