डॉ.गफ्फार कादरी यांना वंचितची उमेदवारी मिळाल्याची अफवा, कादरींनी दिले स्पष्टिकरण
डॉ.गफ्फार कादरी यांना वंचितची उमेदवारी मिळाल्याची अफवा, कादरींनी दिले स्पष्टिकरण...
सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे डॉ.कादरींनी सांगितले...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) आज वंचित बहुजन आघाडीच्या दहा उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. वंचितच्या ऑफिशियल पेजवर हि यादी उमेदवारांच्या फोटोसह व्हायरल करण्यात आली. परंतु यामध्ये अकरावा उमेदवार औरंगाबाद पूर्व मधून डॉ.गफ्फार कादरी यांचे छायाचित्र टाकून सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने डॉ.कादरींना स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी सांगितले मी एमआयएमचा प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. काल एका बैठकीत आतापर्यंत उमेदवारी मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांची भेटीगाठी सुरू आहे. पुढे काय करायचे आहे निवडणुकीत भुमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी लागणार आहे. कोणीतरी फेक लेटर बनवून ते पत्र व्हायरल केले आहे मला वंचितची उमेदवारी मिळाली नाही ती अफवा आहे त्यावर कोणी विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?