जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे जोरदार स्वागत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रवास
जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रवास औरंगाबाद,दि.30 (डि-24 न्यूज) आज जालना रेल्वे स्थानकावरून जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले ,या रेल्वेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते औरंगाबाद दरम्यानचा प्रवास केला.
रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत त्यांचे केले. यावेळी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरीभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय सिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांची उपस्थिती होती. जालना -मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे स्थानकात रेल्वेचे शालेय विद्यार्थी, रेल्वे प्रवाशी, स्थानिक नागरिक यांनीही उत्साहात स्वागत केले. मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशासाठी मुंबई येथे जाण्यासाठी ही रेल्वेची जलद सोय उपलब्ध झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छाही दिल्या.
What's Your Reaction?