शहरात श्रीगणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, पोलिसांचा चोख बंदोबस्त
शहरात श्रीगणेश विसर्जन मिरवणूक शांततेत...!
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात विसर्जन...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- आज शुक्रवारी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त जिल्हा गणेश महासंघ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या उत्साहात विविध स्वागत मंचांना तसेच शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
या प्रसंगी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पृथ्वीराजभाऊ पवार, जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे पाटील, कार्याध्यक्ष विशाल दाभाडे, दिनेश राजे भोसले, संदिपजी शेळके तसेच महासंघाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध स्वागत मंचांना भेट देत गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने निर्माण झालेला बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा यांचा अनुभव या भेटींमधून आला.
यावेळी पोलीस प्रशासनाच्या स्वागत मंचालाही भेट देण्यात आली. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
या प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जिल्हा गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि एकजुटीचा संदेश देणारा उत्सव आहे. याच भावनेने सर्व गणेश मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन उत्सवाची परंपरा जपली.
सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात नेहमी शांतता, बंधुभाव आणि एकोपा नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली...!
याप्रसंगी गणपती बाप्पा मोरया...!
मंगलमूर्ती मोरया...!
पुढच्या वर्षी लवकर या...! हा जयघोष करत बाप्पांचे विसर्ज
न करण्यात आले.
What's Your Reaction?