मंत्री नितेश राणेसह बाबा रामगिरी यांना अटक करा...!

 0
मंत्री नितेश राणेसह बाबा रामगिरी यांना अटक करा...!

मंत्री नितेश राणेंसह रामगिरी बाबांना अटक करा!

मुस्लिम नुमायंदा कौन्सिलची विभागीय आयुक्तांकडे मागणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)

मंत्री नितेश राणे व बाबा रामगिरी यांना अटक करावी. अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पुन्हा बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू केले जाईल. असा इशारा मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने सोमवारी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला.

बाबा रामगिरी यांच्या विरोधात 74 तर नितेश राणे यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात 6 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. उलट सरकारने नितेश राणे यांना मंत्रिपद दिले. दोघांविरोधात सरकारने अटकेची कारवाई करावी. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने 18 सप्टेंबर ते 19 नोव्हंबर या कालावधीत 31 दिवस या मागणीसाठी बेमुदत साखळी धरणे आंदोलन करण्यात आले होते. आता सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना अटक करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची कोणीही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात विटंबना व अपमानजनक व्याख्यान करणे. वक्तव्य करणाऱ्या विरोधात कडक कायदा बणवण्यासाठी विधानसभेत बील आणावे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा बील 2024 रद्द करण्यात यावे. औरंगाबादचे नामांतर करण्यात आले तो निर्णय मागे घ्यावा. नव्या शहरात नवीन महानगरपालिका स्थापन करुन त्या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यात यावे. परभणी येथे झालेल्या संविधानाची विटंबना व सोमनाथ सुर्यवंशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी.  

संविधानाची वारंवार विटंबना होण्याच्या घटना घडत आहेत. यावर प्रतिबंध लावण्यासाठी कडक पावले उचलली पाहिजेत. परभणीत झालेल्या हिंसक घटनेची सखोल चौकशी करावी. हिंसक घटना रोखता आली असती ती रोखण्यासाठी जे अपयश पोलिस अधिकारी यांना आले अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या घटनेची न्यायालयाचे पिठासीन न्यायाधीश मार्फत चौकशी करून सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

यावेळी मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी, मेअराज सिद्दीकी, मुनतजीबोद्दीन शेख, कामरान अली खान, हाफिज मुख्तार खान, अब्दुल मोईद हशर, शोएब सिद्दीकी, अॅड फैज सय्यद, शोएब सिद्दीकी, मौलाना शरीफ निझामी, जावेद कुरैशी, तय्यब जफर आदी उपस्थित होते.

-----------------------------  

सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियाला दोन कोटी द्या

पोलिस कोठडीत शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला दोन कोटींची आर्थिक मदत देण्यात यावी. कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी, पाच एकर शेती खैरलांजी प्रकरणाप्रमाणे निर्णय घेण्यात यावा. संविधानाची व कुठल्याही धर्माच्या महामानवाची विटंबना होणार नाही यासाठी कडक कायदा बणवण्यात यावा. मागणीचे निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow