शहरात मुसळधार, झाड कोसळले, काही घरात घुसले पाणी
शहरात मुसळधार, एक झाड कोसळले तर काही घरात पाणी....
महापालिकेच्या अग्निशमन दल मदतीसाठी तत्पर पण अनेक घरांत पाणी घुसले मदत मिळत नाही अशा तक्रारी... कंट्रोल रुम सुरू आहे का नागरीकांचा प्रश्न...
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही वस्त्यांमध्ये काही घरात पाणी घुसले तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. शहरातील नाले पहील्यांदा तुडुंब वाहत आहे. पावसाळ्यातील हा जोरदार पाऊस झाल्याने उकाडा कमी झाला. रेल्वेस्टेशन रोड, बन्सीलाल नगर जवळ एक जुने झाड कोसळले त्यामध्ये एक ऑटो चेपून गेली आहे. जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवली. कोसळलेले झाड बाजूला सारून रस्ता मोकळा केला. हाॅटेल विटस जवळ पाणी साचल्याने अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असता पाणी काढण्याच्या पंपाच्या धुरामुळे 3 जवानांचा श्वास गुदमरल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना कंट्रोल रुम व मनपाची यंत्रणा ठप्प दिसून येत आहे. स्वतंत्र कंट्रोल रुम व त्यांचे मोबाईल नंबर शहरातील नागरिकांना माहिती नसल्याने मदत कोणाला मागायची हा प्रश्न विचारला जात आहे.
मिसारवाडी, नारेगाव, सईदा काॅलनी, जटवाडा रोड, पडेगाव, हर्सूल व काही वस्त्यातील काही घरात पाणी घुसले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हवामान विभागाने आणखी काही दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने महापालिकेच्या वतीने काय तयारी करण्यात आली असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे.
What's Your Reaction?