किराडपुरा येथे फुलंब्रीचे नवनिर्वाचित नगराध्यक्षांची लाडूतूला, काँग्रेसचे इब्राहीम पटेल मनपा निवडणुकीच्या मैदानात...

 0
किराडपुरा येथे फुलंब्रीचे नवनिर्वाचित नगराध्यक्षांची लाडूतूला, काँग्रेसचे इब्राहीम पटेल मनपा निवडणुकीच्या मैदानात...

किराडपु-यात फुलंब्रीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांची लाडूतूला व जंगी सत्कार, काँग्रेसचे इब्राहीम पटेल मनपा निवडणुकीच्या मैदानात...तीन प्रभागात राजकीय वर्चस्व 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. उबाठाचे राजेंद्र ठोंबरे नगराध्यक्ष निवडून आल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यासोबतच 12 नगरसेवक निवडून आले. यामध्ये काँग्रेस, उबाठा व राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले. त्यांचा किराडपुरा येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी लाडूतूला करुन जंगी सत्कार केला. याप्रसंगी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. फटाक्यांच्या आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. याप्रसंगी राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले फुलंब्रीत जशा प्रकारे यश मिळाले तशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी परिश्रम घेतले जातील. काँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहीम पटेल हे मनपा निवडणुकीत उभे राहणार आहे मतदारांनी प्रभागाच्या विकासासाठी मतदारांनी त्यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या प्रचारासाठी सर्व नेते प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. इब्राहीम पटेल यांनी सांगितले प्रभाग क्रमांक 11, 12, 13 यापैकी कोणत्याही प्रभागातून काँग्रेसने उमेदवारी दिली तर तयार आहे. या प्रभागात नक्की घवघवीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. इब्राहीम पटेल यांचा तीनही प्रभागात वर्चस्व असल्याने काँग्रेसला फायदा होईल असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

याप्रसंगी फुलंब्रीचे नगरसेवक सुश्मेत प्रधान, जमीर पठाण, पवन घोडके, सना कौसर, हलिमा बी कुरैशी, अन्नू जमील शाह, जावेद खान, मसर्रत जफर चिश्ती, मुदस्सर पटेल, उमेश दुतोंडे, अर्शिया रिझवान खान, सामाजिक कार्यकर्ते मुबीन पाशा, सुरेश कर्डीले, प्रतिक अंकुश, संतोष बोडखे, राहुल सोनवणे, नारायण दळवे, श्रीराम इंगळे, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, ताहेर पटेल , रफीक पटेल, अब्बु पटेल, सरनवाज अन्सारी, शफी मौलाना, फेरोज खान, फय्यू शेख, निसार पटेल, शौकत पटेल, सय्यद जाविद, खालिक देशमुख , शेख हुजुर, शेख अस्लम, सदफ पटेल, शहेबाज पटेल, नईम शेख, आसेफ शेख व शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow