किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक संपन्न...
जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक
भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या घरी महायुतीच्या चर्चेची फेरी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) -छत्रपती संभाजीनगरात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची बैठक भाजपा जिल्हा शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
या बैठकीला कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि माजी राज्यमंत्री भागवत कराड, आमदार संजय केणेकर, भाजपा निवडणूक प्रमूख समीर राजुरकर,
शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, विकास जैन, ऋषिकेश जैस्वाल यांची उपस्थिती होती.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आली आहे , आणि लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल.
आमची बोलणी सुरू आहेत, आम्हाला युतीत लढायचे आहे, उद्या आम्ही पुन्हा बसणार असून जागा वाटप अंतिम होईल.
दोन्ही पक्षाकडे इच्छुकांची गर्दी असल्याने साहजिकच दोन्ही पक्षाला आपापल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका आहे. असे कॅबिनेट मंत्री अतुल सावे म्हणाले.
किशोर शितोळे –
" अतिशय सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले जागावाटपाची बोलणी सुरू असून लवकर आम्ही अजून उद्या अंतिम बोलणी साठी बसणार आहोत. दोघांनी युतीत लढणेच सोयीचे आहे असं ते त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?