सातारा, देवळाई, बीड बायपास रोड परिसरातील सुमारे 225 मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी

 0
सातारा, देवळाई, बीड बायपास रोड परिसरातील सुमारे 225 मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी

सातारा, देवळाई, बीड बायपास रोड परिसरातील सुमारे 225 मालमत्तांची कागदपत्रांची तपासणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) 

दिनांक 3 जून पासून महानगरपालिकेतर्फे रस्ता रुंदीकरण मोहीमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे.

 यादरम्यान दिनांक 12 जुलै शनिवार रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व आमदार खासदार यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या बैठकीस शहरातील मुख्य डीपी रस्त्यांवरची अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आता डीपी रस्त्यांचे लगत सामासिक अंतरामध्ये जे मालमत्ता आहेत त्यांचे कागदपत्रे महापालिकेचे पथक तपासणार आहे. या कागदपत्रांमध्ये बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण दाखला आणि मालमत्ता कर भरणा या बाबींचा प्रामुख्याने समावेश राहील.

या अनुषंगाने महापालिकेच्या 10 पथकांनी आज बीड बायपास रोड, सातारा-देवळाई परिसर येथे सुमारे 225 मालमत्तांची कागदपत्रे तपासली, अशी माहिती नगररचना विभागांनी दिली आहे.

 नागरिकांनी पथकाशी सहकार्य करावे, असे आवाहन जी श्रीकांत यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow