थकीत मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याची काँग्रेसची मागणी
 
                                थकीत मालमत्ता करावरील व्याज माफ करण्यासाठी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा, पालकमंत्र्यांना निवेदन....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)
मनपाने मालमत्ता करावरील व्याज माफ करण्यासाठी, शहरातील सामान्य जनता व गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्ह्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांना खा.डॉ.कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. सदरील प्रश्नावर गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली व मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी खा.डॉ.कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ, इक्बालसिंग गिल, बबन डिडोरे, शेख अथर, मदन सातपुते, इंजि. विशाल बन्सवाल, अतिष पितळे, बाबूराव कवसकर, योगेश थोरात, शफिक शहा, निलेश आंबेवाडीकर, प्रमोद सदाशिवे, चंदप्रभा खंदारे, इंदुताई खरात, सुहासिनी घोरपडे, इंजि.इफ्तेकार शेख, अशोक पगार, कावरे पाटील, तय्यब पटेल, मुजफ्फर खान, विनायक सरवदे, रऊफ देशमुख, मुनीर पटेल, आबेद जहागिरदार, एकनाथ त्रिभुवन, नदीम सौदागर, शेख फय्याजोद्दीन, योगेश बहादुरे, चक्रधर मगरे, शशिकला मगरे, सुहासिनी घोरपडे, मुद्दसिर अन्सारी, जकी मिर्झा यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            