मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर समाजात नाराजी...!

 0
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर समाजात नाराजी...!

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर व्यक्त केली नाराजी...!

महंत रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांना अटक करण्याची पत्रकार परिषदेत मागणी...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.19(डि-24 न्यूज) सन 2018 मध्ये झालेल्या सत्संगात महंत रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज हे इस्लाम धर्माची स्तुती करतात. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर गौरवोद्गार काढतात आणि अचानक निवडणूक जवळ येत असताना प्रेषित मोहंमद पैगंबर व इस्लाम विरोधी वक्तव्य ते कोणाच्या इशा-यावर करत आहे याची माहिती आमच्याकडे आहे. त्या महंतांनी मुस्लिम धर्माबद्दल कथित वक्तव्य केले त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाठराखण करत आहे. हा कसला न्याय आहे असा प्रश्न 

पत्रकार परिषदेत सय्यद बाबर अली कादरी रजवी यांनी विचारला आहे.

 मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सत्संगात जाऊन केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आहे. त्या वक्तव्याने मुस्लिम समाजात नाराजी आहे. इस्लाम धर्मात शिकवण आहे दुसऱ्या धर्मांचे आदर करावे. मुस्लिम धर्मगुरु कधीच कोणाच्या धर्माच्या विरोधात बोलत नाही आदर करतात. दुसऱ्या धर्माबद्दल बोललो तर देशाची शांतता भंग होईल मग असले पाखंडी संत ज्यांना वेद आणि सनातन धर्मात असे कोठेही लिहिले नाही की दुसऱ्यांच्या धर्माबद्दल अपशब्द बोलावे. महंत रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरीही त्यांना आतापर्यंत अटक केली जात नाही मग न्याय कोणाकडे मागावा. आम्ही शुक्रवार पर्यंत कार्यवाहीची वाट पाहणार नसता रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करु अन्यथा न्यायालयात दाद मागणार आहे, रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आम्ही हे सहन करु शकत नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत सय्यद बाबर अली कादरी रजवी यांनी दिली आहे.

यावेळी मुफ्ती अन्सार मिस्बाह, गुलखान रज्वी, हाफिज जुलकरनैन, अब्दुल अजित खत्री, मौलवी जावेद खान, सय्यद अफ्हाम हुसैनी यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow