छत्रपती संभाजी महाराज यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

 0
छत्रपती संभाजी महाराज यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

मनोज जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी आलोय

छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

औरंगाबाद,दि.4(डि-24 न्यूज) शहरातील गॅलेक्सि सुपरस्पेशालिटी हाॅस्पीटल मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या उपचारादरम्यान व्यत्यय येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून त्यांना भेटण्यासाठी स्वतः हून त्यांचे समर्थक खबरदारी घेत आहे. त्यांची तब्येत बरी असल्याने डॉक्टरांनी भेटायला परवानगी दिली म्हणून आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला छत्रपती संभाजी महाराज आले होते. त्यांनी दुपारी त्यांची भेट घेऊन उपचाराबाबत माहिती घेतली.

भेटीनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले 

मनोज जरांगे यांच्या माध्यमातून हा लढा उभा राहिलेला आहे. समाजही त्यांच्याकडे विश्वासाने पाहत आहे. ज्या मागण्या मनोज जरांगे यांनी ठेवले आहेत, त्या पूर्ण होतील असा मला विश्वास आहे, असे सांगत मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी मी इथे आलो आहे, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.

मनोज जरांगे पाटील हे शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी हॉस्पिटलला जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर यांची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले आपल्या जिवापेक्षा आपला समाज मोठा व्हावा, असे संस्कार शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे आहेत. समाजासाठी वेळ देणाऱ्या लोकांना ताकद देणे, त्यांना बळ देणे, ही आमची जवाबदारी आहे, म्हणून मी सुरुवातीला उपोषण सुरू असतानाही आलो होतो, आणि आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांची भेट घेण्यास आलो आहे. मनोज जरांगे आणि शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेतनंतर तारखेचा घोळ समोर येत आहे, यावर त्यांना विचारले असता, माझ्यासाठी हा फार मोठा विषय नाही, दोघांच्या समझोत्यानंतर मार्ग निघेल, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू असलेली सर्व कार्यवाही ही राईट ट्रॅकवर आहे. मुख्यमंत्री युद्ध पातळीवर त्यांचे काम करत आहे आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल, असा मला पुर्ण विश्वास आहे. सरकार आणि त्यांच्या टीमने वेळ दिला आहे, तर आपण सर्वांनी वाट पाहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow