दिवाळी सणासाठी लालपरीची 10 टक्के भाडेवाढ...!

दिवाळी सणादरम्यान लालपरीची 10 टक्के भाडेवाढ...
औरंगाबाद,दि.4(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिवाळी हंगामात 10 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे.
शनिवारी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी एमएसआरटीसीने आपल्या सर्व प्रकारच्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.
महसूल वाढवण्यासाठी MSRTC दरवर्षी हंगामी भाडेवाढीच्या सूत्रानुसार सुट्टीच्या दिवशी भाडे वाढवते.
ही भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 8 ते 27 नोव्हेंबरदरम्यान लागू होईल. त्यानंतर मूळ तिकीट दरानुसार तिकीट आकारणी सुरू होईल.
तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे त्यांना त्यांच्या तिकिटाची उर्वरित रक्कम प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी वाहकाला भरावी लागेल असे सूत्रांनी सांगितले.
What's Your Reaction?






